क्राइमराज्यसातारा

कराडातील शिवशंकर नागरी पतसंस्थेत १३ कोटींचा अपहार

कराड : ठेव नसताना ठेव तारण कर्जाचे वाटपासहीत विनातारण कर्ज वितरण, कागदपत्रांचीही पूर्तता न करताच कर्ज वितरणासारखे आणि खोट्या सह्या, बनावट कागदपत्रांच्या आधारावर शिवशंकर नागरी पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजारांचा अपहार झाला आहे. या अपहाराचा अहवाल विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी दिला आहे. त्यानुसार त्या सगळ्याची पोलिस चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी दुजोरा दिला आहे. पतसंस्थेच्या ठेवीदारांनाही पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून त्याबाबतचे निवेदनही पोलिसांना ठेवीदारांनी दिले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील शिवशंकर पतसंस्थेत एक एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षन झाले. ते लेखा परिक्षण विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी केले आहे. त्यानुसार त्यांनी अहवाल दिला आहे. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार अपहार झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. त्यानुसार संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी सुचवले आहे. त्याशिवाय उपनिबंधक जनार्दन शिंदे यांनीही विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी सादर केलेल्या अहवालत पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार अपहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्या आर्थिक नुकसानीस जबाबादर असणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्याचेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. कर्ज वितरण करताना तारण न घेणे, अपूर्ण कागदपत्रे, त्यासह व्यवस्थापक व सेवकांच्या मदतीने तयार केलेल्या खोट्या व बनावट कागदपत्रे वापरली आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या हीतास बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्वासघात, फसवणूक करून संचालक मंडळाने हेतु पुरस्सर नियमबाह्य व पदाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने तब्बल ११ कोटी ५३ लाख १६ हजार ९१५ रूपयांचा अपहार केल्याचा ठपका त्यानीही ठेवला आहे. त्यासह ठेव नसताना ठेव तारणाच्या नावाखाली तब्बल एक कोटी ५६ लाख ७९ हजारांचे कर्जही वितरण केल्याचे त्यांच्या अहवालात नमूद आहे. पोलिसांनी ते अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार त्याची त्या सगळ्याची पोलिस चौकशी सुरू झाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार त्या सगळ्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याबाबतची कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close