कराड ः कोपर्डे हवेली ता. कराड येथे ऊस वाहतुकीसाठी शेतातून वाट देण्याच्या कारणावरुन शेतकऱ्यावर कोयत्याने वार करीत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शोभा जगन्नाथ साळवे यांनी फिर्याद दिली आहे.
सोमनाथ मधुकर चव्हाण-काळकुटे व लक्ष्मी मधुकर चव्हाण-काळकुटे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोपर्डे हवेली येथील जगन्नाथ साळवे व त्यांची पत्नी शोभा हे दोघेजण त्यांच्या उत्तर कोपर्डे येथील शेतात ऊसाचा पाला काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेतानजीकच मधुकर चव्हाण याचे शेत आहे. त्या शेतातील जाण्या-येण्याच्या वाटेच्या कारणावरुन चव्हाण व साळवे यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, मंगळवारी मधुकर चव्हाण याच्या ऊसाला तोड आली होती. या ऊसाची वाहतूक तो साळवे यांच्या शेतातून करणार होता. मात्र, जगन्नाथ साळवे यांनी त्याला विरोध केला.
यापुर्वी तु आमचा ऊस तुझ्या शेतातून जावू दिला नाही. त्यामुळे आत्ता तुझा ऊस आमच्या शेतातून न्यायचा नाही, असे जगन्नाळ साळवे यांनी सांगीतले. त्यावेळी मधुकर चव्हाण याने तुला जिवंतच ठेवत नाही, असे म्हणून पाठीमागून येवून जगन्नाथ साळवे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यावेळी शोभा या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असताना त्यांनाही कोयत्याने जखम झाली. तो कोयता हातातून खाली पडल्यानंतर मधुकर चव्हाण याने पिशवीत असलेला दुसरा कोयता काढून पुन्हा जगन्नाथ साळवे यांच्या चेहयावर वार केला. तसेच लक्ष्मी चव्हाण हिनेही शोभा साळवे यांना ऊसाने मारहाण केली. त्यामध्ये जगन्नाथ साळवे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे करीत आहेत.

Tags
crime news Karad Satara