ताज्या बातम्याराजकियराज्य

मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही

कराडात पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

कराड ः मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसच्या लोकांना अजिबात संविधान बदलू देणार नाही. काँग्रेस सातत्याने काही आरोप करत आहे. पण हा त्यांचा डाव आहे. काँग्रेस आणि आघाडीवाल्यांनो नीट ऐका, जोपर्यंत मोदी जिवंत आहेत आणि जोपर्यंत मला जनतेकडून भरभरून आशीर्वाद मिळत आहे, तोवर तुम्ही धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. आणि संविधान तर मूळीच बदलू शकणार नाही,“ असे पंतप्रधान मोदींनी खडसावून सांगितले.
कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा सैदापूर कराड येथे झाली. सभेस खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रिय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ, माजी आ. आनंदराव पाटील, माजी आ. मदनदादा भोसले, नरेंद्र पाटील, वसंतराव मानकुमरे, आरपीआयचे अशोकराव गायकवाड, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमित कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “देश स्वतंत्र झाला असला तरी काँग्रेसने गुलामगिरीची मानसिकता देशात तशीच ठेवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलावर साऱ्या जगाचा विश्वास होता, पण इतकी वर्षे स्वतंत्र भारताच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांच्या चिन्हाचाच भाग ठेवण्यात आला होता. भाजपाचे सरकार आल्यानंतर हे चिन्ह बदलले आणि नौदल ध्वजावर छत्रपती शिवाजी महारांजाच्या चिन्हाला स्थान दिले गेले,“ याकडे मोदींनी लक्ष वेधले.
“आज आपले भाजपा सरकार दरमहा 80 कोटी गरजू लोकांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे. पण काँग्रेस सरकारची गरिबांप्रती काय वृत्ती होती, याचा अंदाज त्यांच्या धोरणांवरून लावता येऊ शकतो. काँग्रेसची सत्ता असताना सरकारी गोदामांमध्ये हजारो टन धान्य सडून जायचे. मात्र काँग्रेस सरकार ते गरिबांना द्यायला तयार नव्हते,“ अशी सडकून टीका मोदींनी काँग्रेसवर केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सभेला उपस्थित प्रत्येकाने घरोघरी जाऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन करावे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशाने विश्वास टाकला आहे. हा विश्वास आपण सार्थ ठरवूया. खा. उदयनराजे भोसले यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत. त्यामुळे मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे आहेत ज्यांनी लोकांच्या कल्याणाचा, त्यांच्या हिताचा राज्यकारभार केला. लोकशाहीचा जन्मच त्यांच्या राज्य कारभारापासून झाला. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. म्हणूनच देश विकासाच्या वाटेवर आहे. दोन खासदार संख्या असणारा भाजपा होता. पण आज जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ओळखला जात आहे. यापूर्वी गरीबी हटाओ, जय जवान जय किसानाच्या अनेक घोषणा झाल्या. जनता त्याला भुलली. कारण त्यांच्या समोर दुसरा पर्याय पण नव्हता. जनता काँग्रेसच्या भुलभापांना भुलली. पण नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने गोरगरीबांना न्याय मिळाला आहे. गोरगरीब, सामान्य जनतेसाठी अनेक योजना मोदी सरकारने राबविल्या आहेत. शेतकऱ्यारी, देशाचे जवान यांच्यासाठी नियोजनबध्द कृती कार्यक्रम त्यांनी आखला आहे. जगभरात भारताचा लौकीक वाढला आहे तो केवळ मोदी यांनी केलेल्या भरीव कामांमुळे आणि घेतलेल्या धाडशी निर्णयामुळे. त्यांनी देशाला स्थिर सरकार दिले आहे. विरोधकांकडून संविधान बदलणार असा प्रचार केला जात आहे. पण जगाला आदर्श असणारे संविधान कदापि बदलले जाणार नाही, असेही खा. उदयनराजे म्हणाले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात विकासकामांचा झंझावत सुरू आहे या विकासाला केंद्र सरकारचे भरक्कम पाठबळ आहे. मोदींच विशेष लक्ष महाराष्ट्रवरती आहे तर सातारच्या गादीवर विशेष प्रेम आहे. सातारा जिल्हा विकासकामांच्या पाठीशी उभा राहणार आहे. महायुतीची तुल्यबळ ताकद जिल्ह्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शासन आपल्या दारी ही योजना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविली.
आमदार महेश शिंदे म्हणाले, दुपारच्या भर उन्हात लाखाची सभा होत आहे. जिल्ह्यातील जनतेने ठरवलेयं शेतकरी, माथाडी कामगारांना लुटणाऱ्यांना या निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय थांबायचे नाही. जे लोक मुतारीत पैसा खातात ते लोक संसदेत जाऊन करणार तरी काय? सामान्यांशी निगडीत असणाऱ्या मोठ्या संस्थेमध्ये हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांनी दाखल केली आहेत. अशा या फरार गुन्हेगाराला आपण निवडून देणार आहात काय? सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हजारो कोटी निधी संचिनासाठी आला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण शेती सिंचनाला आणण्याची काम राज्य सरकार करत आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे विचार ऐकाला आपण एकत्र आलो आहेत. सभेनंतर आपण घरी जाऊ, गावात जाऊ, प्रभागात जाऊ त्यावेळी मोदींचा निरोप, स्वप्न, संकल्पना आपल्या इथे घेऊन जायची आहे. ही देशाच्या भवितव्याच्या निवडणूक आहे. देशाच्या सुरक्षेची निवडणुक आहे. मोदींच्या मागे ताकदीने उभे राहण्याची निवडणूक आहे.
काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगू शकत नाही. देशाची प्रगती, देशाच्या सुरक्षितेची भाषा ही महाविकास आघाडीची मंडळी करत आहेत. नरेंद मोदी यांनी सरकारच्या माध्यमातून असंख्य योजना राबविल्या. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार पहायला मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये हे पहायला मिळत होता का? याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवगय समाज, ओबीसींसाठी थेट योजना राबविण्याचे काम नरेंद मोदी यांच्या माध्यमातून राबवण्याचे काम सुरू आहे. यासाठी महायुतीच्या पाठीमागे आपली ताकद उभी करण्याची गरज आहे.  ही देशाच्या भवितव्याच्या निवडणूक आहे. देशाच्या सुरक्षेची निवडणुक आहे. नरेंद्र मोदी यांच्या मागे ताकदीने उभे राहण्याची निवडणूक आहे. कोण काय अपप्रचार करतय, टिकाटिपणी करतयं याकडे लक्ष देऊ नका. सातारचा खासदार हा नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा आहे हे मतदातून दाखवून द्या.

नरेंद्र मोदींचं वाढवायच असेल बळ तर द्या उदयनराजेंचं निवडून कमळ… शशिकांत शिंदे निवडणुकीला उभे राहून फसले कारण निवडून येणार आहेत उदयनराजे भोसले…शिंदेची भानगड पाहून वाशीचे लोक हसले अन्‌‍ उदयनराजे लोकसभेत जाऊन बसले…साताऱ्यामध्ये झालेले आहे उदयनराजे अन्‌‍ शिवेंद्रराजेंची एकी त्यामुळे राष्ट्रवादी वाल्यांची फिरलेली आहेत डोकी… अशा काव्यांमधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत देश, संविधान, लोकशाही मजबूत करायची आहे. सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे.  विकासाचा ध्यास घेतलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. ओबीसी समाजाचा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेले इंडिया आघाडीला आवडत नाही. देश प्रगतीपथावर चालत असलेला विरोधकांना बघवत नाही. यामुळे नरेंद्र मोदी देश मे चमकणे वाला तारा इस लिये हम सब लोग बजा रहे है राहूल गांधीके बारा… असे ते म्हणाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close