राज्यसातारा

तळबीडला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही : ना. जयकुमार गोरे

तळबीड येथे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश व विविध विकासकामांचे भूमिपूजन 

कराड : तळबीड गावाने परकीयांशी लढण्यासाठी निधड्या छातीचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते दिले. अशा ऐतिहासिक तळबीड गावाला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले.
ते तळबीड ता .कराड येथे साडेतीन कोटीच्या विविध विकास कामाच्या भूमीपुजन प्रसंगी व भाजपा मधील पक्षप्रवेशा वेळी बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, उत्तरचे आ. मनोज घोरपडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, महेश जाधव, सागर शिवदास, योगीराज सरकाळे, उमेश मोहिते, तळबीड सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच संगीता मोहिते, राजेंद्र मोहिते उपस्थित होते.
यावेळी ना. गोरे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपा महायुतीची सत्ता आल्यापासून विकासाची प्रगती सुरू आहे. तसेच तळबीड गावावर माझे विशेष प्रेम असून यापूर्वीही मी तळबीडला निधी मंजूर केला आहे. दरम्यान उमेश दादा व त्यांच्या सहका-यांनी तळबीड मधील विविध विकास कामासाठी निधीची मागणी केली होती. त्या विकास कामासाठी 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
आ.अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आमदार हे महायुतीचे आहेत. आम्ही महायुती म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद व  पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तसेच उमेश मोहिते व सरपंच मृणालिनी मोहिते यांनी तळबीडसह संपूर्ण गणात अनेक सामाजिक कार्य केली आहेत.
आ. मनोज घोरपडे म्हणाले, तळबीड हे ऐतिहासिक गाव असून गावातील विकास कामामुळे पर्यटनाची खूप मोठी संधी निर्माण होणार आहे. तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही. कारण माझ्या आमदार फंडातील मी निधी देणारच परंतु त्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मतदार संघातील प्रत्येक गावाला विशेष निधी आणणार आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार असून संपूर्ण जिल्हा परिषद ही भाजप महायुतीची होणार आहे कराड पंचायत समितीसह  उत्तर मधील सर्वच्या सर्व सीट या महायुतीच्या निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले.
 यावेळी तुकाराम नलावडे, महेश घार्गे, धनाजी पाटील, श्रीकांत पिसाळ, विकास गायकवाड, जयवंत जाधव, शैलेश चव्हाण, चंद्रकांत जाधव, सुरेश तात्या पाटील, शहाजी मोहिते, दीपक खडंग, रमेश मोहिते, सुजय मोहिते, विशाल मोहिते, शशिकांत मोहिते, रणजीत पाटील याच्यासह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close