
कराड ः शहर परिसरातून नव्या दुचाकी चोरणाऱ्या संशयीतास पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याच्याकडून तब्बल १५ लाख ३० हजारांच्या १७ दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रकाश निंबाळकर (वय ४५, रा. मौजे सांगाव ता. कागल जि. कोल्हापुर) असे संशयीताचे नाव आहे. तो सराईत संशयीत असल्याचे पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शहर पोलिस ठाण्याच्या डीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत शहर परिसरातून चोरलेल्या १३ तर पेठवडगावच्या हद्दीतून चोरलेल्या चार दुचाकी जप्त आहेत. निंबाळकर पोलिस रेकॉर्डवरील संशयीत आहे. त्याच्यावर यापूर्वी २००९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर तो पुन्हा सक्रीय झाला, मात्र त्याने कोल्हापूर जिल्हा सोडून चोऱ्या करण्यास सुरूवात केली होती. मात्र तो येथील पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती संशयीतरित्या शहर व परिसरात फिरत आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक के. एन. पाटील व डीबीचे पंतग पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारातर्फे मिळाली. फौजदार पाटील यांनी त्याची खात्री केली. ती माहिती खरी असल्याने त्याच्यावर वॉच ठेवला. त्यानंतर बीट मार्सल पोलिसांच्या पथकाच्या मदतीने डीबीच्या कर्मचाऱ्यांनवी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो उडवा उडवीची उत्तेर देत होता. पोलिस तपासात त्याचे नाव प्रकाश निंबाळकर असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने एक, दोन नव्हे तब्बल १७ दुचाकी चोरीची कबुली देताच पोलिसही चक्रावले.
निंबाळकरकडे पोलिसांनी कसून चौकशीला सुरूवात केली. त्यावेळी डीबी पथकाला त्याच्याकडून १५ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात यश आले. चोरीच्या दुचाकींच्या तपासाबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकुर यांनी तपासाच्या सुचना केल्या त्यात उपनगरात होणाऱ्या दुचाकी चोऱ्यांचा आढावा घेतला. त्याबाबत पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डीबीचे पंतग पाटील यांच्या पथकाने तपास केला. त्यात सहायक फौजदार रघुवीर देसाई, नागनाथ भरते, हलदार शशिकांत काळे, अमित पवार, बाळासाहेब जगदाळे, अशोक वाडकर, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांनी तपासात भाग घेतला. डीबीने आखलेल्या सापळ्यात निंबळकर अडकला. त्याच्याकडून शिताफीने १५ लाख ३० हजारांच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याला आगाशिवनगर परिसरात बीट मार्शलच्या पथकाने अटक केली.