ताज्या बातम्याराजकियराज्य

मराठा समाज विधानसभेला पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल : मनोज जरांगे पाटील

मुंबई : राजकारणात आता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल. आता नाव घेतले नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल.

यावेळेस फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच आता माझी तब्बेत बरी आहे, काळजी करायची गरज नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, पाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या.नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही अफवा पसरत आहे. आपण पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही. सर्वांनी विनंती आहे भावनिक होऊ नका. आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहा. आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी उभे राहा. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देईल त्यला मत द्या. जो मदत करेल त्याला मत द्या. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाया पडतील आणि पुन्हा विसरून जातील.मतीमधून आपली ताकद दाखवा.

बीडमधील नारायण गड सभा रद्द झाली कारण तिथे तयारी नव्हती. सर्वांचे हाल झाले असते. पुन्हा यापेक्षा ताकदीने मोठी सभा करू. तिथे अडचणी आहे त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते, असे मनोज जरांगे म्हणाले.

ओबीसी – मराठा वादावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांनी जातीवाद केला नाही.सुरुवात केली नाही. मला काही म्हणाले शहाणपणाची भूमिका घ्या. मी सर्व समाजाला सांगतो त्यांच्यावरची वेळ गेली आहे. त्यांना भांडण लावायचे आहे. समाजाला अन्याय सहन होत नाही म्हणून हे सुरू आहे. मात्र समाजाने शांत राहावे. प्रत्यक्ष जाणूनबुजून त्रास दिला जातोय का? यावर बारकाईने लक्ष ठेवा. ते मुद्दामअसे उद्योग करणार आहे. त्यामुळे कोण काय करतोय त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. नेत्यांचे भागून गेले आहे त्यामुळे ते आता काहीही करतील .

धनंजय मुंडे जातीय वाद करत नाही मला विश्वास होता. पण आता ते पण करू लागले असे वाटू लागले आहे. मराठा समाजाला सांगतो शांत रहा आणि हे काय करतात लक्ष ठेवा. एक महिना सहन करा, अन्याय होत असेल तर मग मात्र संरक्षण करा.माझ्या नावाचा काही जण फायदा घेत आहे .इथे येऊन फोटो घेतात आणि तिकडे दाखवतात मलाच कळत नाही. मात्र माझा पाठिंबा कुणालाच नाही. खोटे फोटो दाखवून का समाजाचे नुकसान करत आहात? जात लक्षात ठेवा निवडून येण्यासाठी काहीही करू नका. आपल्यावर झालेला अन्याय , विसरू नका. एकत्र या एका ताकदीने पाडा.. एका ताकदीने निवडून आणा, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.

राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे आहे. आता भीती वाटतं आहे. पाचव्या टप्प्यात सुद्धा भीती ठेवा.. प्रत्येक मतदार संघात मोदी सभा घेत आहे. 4 तारखेला पुन्हा उपोषण करणार काही झाले तरी करणार. तिथे पुढची दिशा कळेल. पुढचे उपोषण आमरण उपोषण असणार आहे. सविस्तर प्लॅन 4 तारखेला करूय आम्हाला राजकारणात यायचे नाही पण आरक्षण दिले नाही.. आम्ही सर्व मराठा समाज विधानसभेत पूर्ण ताकदीने उतरू.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close