राज्यसातारा

विलासकाकांनी सर्वसामान्य माणसाला सत्तेत बसवून सामाजिक क्रांती घडवली ः ॲड. उदयसिंह पाटील

लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे पुण्यस्मरण निमित्त पुतळ्यास अभिवादन

कराड ः माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोयना सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील  विलासकाकांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पन करून अभिवादन करणेत आले.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे ॲड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील यांनी 1967 पासून कराड तालुक्यात सामान्य माणसांची अभेद्य संघटना उभारणेचे काम केले. सामान्य माणूस राजकारणापासून अलिप्त राहिला तर अवैध्य मार्गाने पैसे मिळवलेले धनिक सत्तेत जातील या जाणिवेतून कराड दक्षिण, उत्तर, पाटण असा भेदभाव न करता सातारा जिल्हा बँक, कराड बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था या सह सर्व संस्थामधून सामान्य माणसाच्या विकासासाठी सर्वसामान्य माणसाला सत्तेत बसवून ख-या अर्थाची सामाजिक क्रांती घडवली. त्याचबरोबर कराड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेला लागणा-या मानवी व आरोग्याच्या सोई सुविधा पुरविण्याचे काम केले. स्व. विलासकाकांच्या कामाचा आदर्श घेणे ही आज काळाची गरज आहे.

यवेळी कोयना सहकारी बँकेचे चेअरमन रोहित पाटील, व्हा. चेअरमन विजय मुठेकर, सातारा, मालकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा काग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, कोयना दूध संघाचे चेअरमन, लक्ष्मण देसाई, यशवंत बँकेचे चेअरमन महेशकुमार जाधव, कोयना बँकेचे संचालक अजित पाटील, जयवंत शिबे , भाऊसो मंडले, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे, सतिश इंगवले, राजेंद्र चव्हाण, संभाजी चव्हाण, गणपत पाटील, जे. बी. लावंड, चतुरदास पटेल, विजयकुमार कदम, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन  रंगराव थोरात, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. लोकरे, तुकाराम काकडे, कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष नितीन थोरात, युवक काँग्रेचे अजित केंजळे तसेच कोयना बँकेचे अधिकारी, सेवक वर्ग उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close