ताज्या बातम्याराजकियराज्य

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पुढील रणनीती निश्चित होईल : शरद पवार

नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या आज (दि.५) संध्याकाळच्या बैठकीनंतर पुढील रणनीती निश्चित होईल, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेची रस्सीखेच सुरू झाली आहे.

राजधानी दिल्‍लीत राजकीय हालचाली वेगावल्‍या आहेत. शरद पवार हे आज सकाळीच दिल्‍लीला पोहचले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काँग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन आल्याने दिल्लीला आलो आहे. आम्ही अजून काही ठरवलेले नाही किंवा चर्चा केलेली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. जो निर्णय होईल तो सामुहिक होईल. मी आता काही सांगणार नाही, बैठकीनंतर सर्वांशी चर्चा करूनच ठरवू. काँग्रेसने टीडीपीला संदेश पाठवण्यास सुरूवात केल्याची माहिती नाही. आघाडीची ही पहिलीच बैठक आहे. त्यानंतर पुढील बैठकीबाबात ठरवणार आहे. कोण नेता होणार यावर आत्ताच चर्चा करणे अयोग्य आहे. आमच्यात चर्चा झाल्यावर पुढील रणनीती ठरवू असे पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील निकालाबाबत बोलताना पवार म्हणाले की, लोकांमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल नाराजी होती. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले हे निकालावरून स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close