राज्यसातारा

गौणखनिज मधील चोर प्रशासनावरती शिरजोर (भाग सहा)

गौणखनिज मधील महाभागाचे कारनामे

कराड : महाराष्ट्र शासन राज्यपत्र दिनांक 7/5/2015 अन्वये प्रकरणपरत्वे लेखी परवानगी व कोणतेही फी किंवा स्वामित्वधन न देता पिढीजात हाताने दगडफोडीचा व्यवसाय करीत असलेल्या समाजातील कुटुंबास त्याच्या व्यवसायाच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल 1966 चा महा. 41 मधील कलम 22 अन्वये 200 ब्रास पर्यंतच्या मर्यादेत दगड काढता येईल 200 ब्रास पेक्षा अधिक उत्खननावर स्वामित्वधन (रॉयल्टी ) आकारण्यात येईल अशी तरतूद आहे.
मौजे नांदलापूर येथील गट नंबर 410/2 मधील शासकीय जमिनीमधून दगड उत्खनन करण्यासाठी एकाने अर्ज केला होता. त्याच्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयाकडून दिनांक 8/12/2015 रोजी दगड उत्खनन करण्यासाठी त्या व्यक्तीस कब्जा देण्यात आला होता. त्यानंतर गावकामगार तलाठी नांदलापूर व मंडल अधिकारी मलकापूर यांनी उत्खनन करण्यासाठी दिलेल्या ठिकाणचा दि.30/1/2016 रोजी सुमारे 528 ब्रास चे उत्खनन केले बाबतचा पंचनामा केला आहे. तहसील कार्यालयामध्ये दि.1/2/1016 रोजी तसा अहवाल गावकामगार तलाठी नांदलापूर व मंडल अधिकारी मलकापूर यांनी सादर केलेला आहे.

त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी अनाधिकृत 328 ब्रास चा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48(7) अन्वये 7 लाख 87 हजार 200 रुपयाच्या दंडाची कारवाई करण्याबाबतचा आदेश दि.29/3/2016 रोजी देण्यात आला. तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार त्या व्यक्तीने दंड न भरता उपविभागीय अधिकारी उपविभाग कराड यांच्याकडे अपील दाखल केले. त्या अपिलाच्या केस मध्ये उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार यांनी दिलेल्या दंडाचा आदेश कायम केला. त्या व्यक्तीने उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरोधात जिल्हा अधिकारी सातारा यांच्याकडे अपील दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी सातारा यांनीही तो झालेल्या दंडाचा आदेश कायम केलेला आहे. अशी वस्तुस्थिती असताना झालेला दंड भरावा लागू नये म्हणून शासकीय अधिकाऱ्यांच्या वरती तक्रारी अर्ज दिले गेले. त्यांच्या विरोधात उपोषणे केली. तो दंड भरावा लागू नये म्हणून हे उद्योग केले असल्याची चर्चा तहसील कार्यालय परिसरात आहे.

सामान्य माणसाला गौणखनिजचा दंड झाला की त्याने तो वेळेत भरला नाही तर त्याच्या जमिनीवरती किंवा घरावरती लगेच बोजा चढवला जातो. परंतु दोन-तीन निकाल होऊनही या व्यक्तीच्या मिळकतीवरती किंवा घरावरती गेली 7 वर्ष झाली तरी अजून बोजा चढलेला नाही. याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होत्या. परंतु प्रशासन याबाबत सावध झाले असून त्याच्या मालमत्तेवरती लवकरच बोजा नोंद होणार असल्याबाबत माहिती मिळत आहे.

क्रमश :

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close