राज्यसातारा

भानगड बाजाचे पुरवठा शाखेतील कारनामे चव्हाट्यावर

कराड : स्वतःला समाजसेवक म्हणून मिरवून घेणारा व किती स्वच्छ चारित्र्याचे असल्यासारखे दिखावा करणाऱ्या तसेच आपणच कराड तालुक्यातील सर्व भानगडी खोरांचे लिखाण करून तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात होत असलेल्या चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण जन्माला आल्यासारखे याला वाटत आहे. तसेच मी किती पवित्र व आयुष्यात कोणत्याच भानगडी केल्या नसल्यासारखे तो शासकीय आवारात वावरत आहे. या भानगडी बाजाने केलेल्या भानगडी पाहिल्यानंतर चोरावर मोर या मराठी म्हणीला योग्य प्रकारे सूट होतंय हा भानगडी बाज मुळात राहण्यासाठी कराडमध्ये आहे. त्याच्या आधार कार्ड वरती पत्ताही कराड मधील आहे. परंतु त्याचे पहिले रेशन कार्ड जखिनवाडी गावातील आहे. त्या रेशन कार्ड वरती एकूण पाच नावे आहेत. त्यापैकी एका नावाला कंस झालेला आहे व चार नावे शिल्लक आहेत.

2021 पर्यंत जखिनवाडी गावातील रेशन कार्ड चालू होते. 2021 मध्ये ते कार्ड डिलीटेड करण्यात आले. त्या डिलीटेड केलेल्या कार्डची ऑनलाईन प्रिंट काढल्यास त्यामध्ये दोनच नावे दिसतात. पत्नीचे व एका मुलाचे नाव त्यातून कमी झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना या भानगड बाजाने जखिनवाडी गावांमधील डिलीटेड झालेल्या रेशन कार्डच्या ऑफलाइन रेशन कार्ड वरती नांदलापूर गावाचा पत्ता बदलून घेतला आहे. पत्ता बदलून घेताना त्या ऑफलाइनच्या रेशन कार्ड वरती चारही नावे असल्याचे दिसून येते. यामध्ये पत्नीच्या व मुलाच्या नावाला कंस झाला नसल्याचे दिसून येते. पण जखिनवाडी येथील डिलीटेड ऑनलाईन पेंडमध्ये पत्नीचे व एका मुलाचे नाव दिसून येत नाही. अशी वस्तुस्थिती असताना ज्या मुलाचे नाव 2021 मध्ये रेशन कार्ड डिलीटेड झालेल्या ऑनलाइनच्या प्रिंटमध्ये कमी झाल्याचे दिसत आहे त्या मुलाचा नॉन क्रिमीलेअर चा दाखला काढण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यामध्ये ज्या मुलाचा दाखला काढायचा होता त्या मुलाचे आधार कार्ड त्यामध्ये जोडलेले आहे, त्या मुलाच्या आधार कार्ड वरती पत्ता मुंबईचा असल्याचे दिसून येत आहे. तर त्याच्या वडिलांच्या आधार कार्ड वरती कराडचा पत्ता दिसून येत आहे. तसेच नांदलापूर गावचा पत्ता असणारे व त्यामध्ये चारही नावे दाखल असलेले ऑफलाइन रेशन कार्ड ची प्रत जोडलेली आहे.
मुलाच्या आधार कार्ड वरती पत्ता मुंबईचा, वडिलांच्या आधार कार्ड वरती पत्ता कराडचा, डिलीटेड झालेल्या कार्डच्या ऑनलाईन प्रिंट मध्ये नाव दिसून येत नसताना या भानगड बाजाने ऑफलाइन रेशन कार्ड मध्ये गावाचे नाव बदलून घेतलेल्या नांदलापूर मधील कार्डची झेरॉक्स प्रत जोडून 2023 मध्ये नॉन क्रिमिलेअर चा दाखला काढून घेतलेला आहे.

हा यावरच थांबेल तर तो महान भानगड बाज कसला म्हणायचा. याने तर आता कहरच केला. या भानगड बाजाला उत्पन्नाचा दाखला काढायचा होता याने मग काय करावे ज्या जखिनवाडी गावातून याचे रेशन कार्ड 2021 मध्ये डिलीटेड झाले होते त्याने त्या रेशन कार्ड वरील जखिनवाडी गावचे नाव कमी करून नांदलापूर गावचे नाव टाकून पत्ता बदलला होता. त्या नांदलापूरच्या बदललेल्या पत्त्याची झेरॉक्स प्रत 2023 ला काढलेल्या नॉन क्रीमिलेयरच्या दाखल्याला जोडलेली असताना या भानगडबजाने 2024 मध्ये स्वतःच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी परत जखिनवाडी गावचे नाव असलेले रेशन कार्ड जोडून उत्पन्नाचा दाखला 2024 मध्ये काढलेला आहे.
म्हणजे या भानगडबाजाकडे जखीणवाडी गावाचा पत्ता असलेले रेशन कार्ड आहे व नांदलापूर गावाचा पत्ता बदलून घेतलेले ही रेशन कार्ड त्याच्याकडे आहे. आणि हा भानगड बाज दोन्ही रेशन कार्ड दाखवून दोन्ही गावातून शासकीय कर्मचाऱ्यांची फसवणूक करून रहिवासी व उत्पन्नाचे दाखले घेऊन त्याला हवे असणारे सर्व दाखले प्रशासनाकडून घेत आहे व त्याचा वापर तो त्याच्या फायद्यासाठी करत आहे.

तसेच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा स्वतःसाठी उत्पन्नाचा दाखला साठ हजाराचा घेतोय. परंतु याची दुसरी पत्नी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षिका असून त्यांना शासनाकडून पगार मिळत आहे. तरीही हा भानगडबाज शासनाची फसवणूक करून साठ हजारचा उत्पन्नाचा दाखला घेत आहे. तसेच पहिले पत्नी व दोन मुले यांचे मुंबई दहिसर येथे रेशन कार्ड असून तेथे धान्याचा लाभ ही घेत आहे. या भानगडबाजांने शासनाची फसवणूक करून स्वतःच्या फायद्यासाठी दोन दोन रेशन कार्ड वापरून वेगवेगळे दाखले काढून स्वतःचा व कुटुंबातील इतरांचा फायदा करून घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व पुरावे घेऊन पत्रव्यवहार केला जाणार असून पुरावे व कागदपत्रे पाहून शासकीय अधिकाऱ्यांनी त्या भानगड बाजा वरती गुन्हा दाखल केला नाही तर शासकीय अधिकाऱ्यांच्या कडून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांच्या विरोधात अमरण उपोषणास बसणार असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच या भानगड बाजाने आजपर्यंत त्यांच्याच समाजातील लोकांच्याकडून पैसे उकळून त्यांचे व्यवसाय बंद पाडून त्यांच्या उत्खननाच्या चौकशी लावून आता हा भानगडीबाज त्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांना पाठिंबा देत असल्याचा बहाना करत असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. तरी याने केलेल्या भानगडीतून वाचण्यासाठी आता याला समाजाची लोक दिसू लागली आहेत. तसेच घरातल्या महिलांनी कमवायचे व त्यांच्या जीवावर घरात बसून खायचे अशा भानगड बाजावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असा इशारा दिलेला आहे.

क्रमश :

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close