राज्यसातारा

प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात मग्न

कराड : हाताने दगडफोड करून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजासाठी शासनाकडून 200 ब्रास दगड उत्खनन करण्यासाठी स्वामित्वधन न घेण्याबाबत राजपत्र काढलेले आहे. या राजपत्राच्या अनुषंगाने त्या समाजाच्या एका व्यक्तीने तसेच कार्यालयात अर्ज करून 200 ब्रास दगड उत्खनन करण्यासाठी परवानगी मागणी केली आहे. तसेच समाजाच्या नावाखाली 200 ब्रास दगड उत्खनन करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून आदेश देताना काही अटी व शर्ती घातल्या जातात त्यामधील अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :
अ) उत्खननाच्या ठिकाणी ब्लास्टिंग द्वारे दगड उत्खनन करता येणार नाही.
ब) सदर ठिकाणी क्रेशर प्लांट पोकलेन जे सी बी या सारखी यांत्रिक साधने लावता येणार नाहीत.
क) दगडफोड पारंपरिक पद्धतीने करणे बंधनकारक राहील खडी क्रशर करून विक्री करता येणार नाही.
ड) हिल कटिंग करता येणार नाही. जमिनीखाली दोन मी.पर्यंत दगड काढता येईल. अशा अटी व शर्ती घालून आदेश देण्यात आले आहेत त्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने अ ब क ड या अटी शर्ती शिथील करून मिळण्याबाबत एकाने उपविभागीय अधिकारी यांना अर्ज केला होता. उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे आलेल्या अर्जामधील अ ब क ड याबाबत मार्गदर्शन मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.

उपविभागीय अधिकारी यांनी मागणी केलेल्या मार्गदर्शन पत्र व्यवहारांमध्ये अ ब क ड याबाबत मार्गदर्शन मागणी केली असताना खनिकर्म अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या 2 – 3 – 2022 रोजीच्या अधिसूचनेतील निर्देशनाचे अवलोकन करणेत यावे. उक्त अधिसूचना व शासन पत्रातील निर्देशाच्या अनुषंगाने आपले स्तरावर उचित कार्यवाही करावी असे उपविभागीय अधिकारी यांना मार्गदर्शन दिले.
उपविभागीय अधिकारी यांनी या आलेल्या मार्गदर्शनावरती तहसीलदार यांना मार्गदर्शनाच्या आदेशाच्या अनुषंगाने शासन निर्णय शासन अधिसूचना व शासन परिपत्रके यामधील तरतुदीचे अवलोकन करून तत्काळ पुढील कार्यवाही करणेत यावी असा आदेश दिला. दि. 2 – 3 – 2022 च्याशासनाने काढलेल्या राजपत्रांमध्ये समाजाच्या कुटुंबाच्या बाबतीत अर्ज केल्यावर स्पोटके वापरून अथवा स्फोटके शिवाय हा मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे. अशी वस्तुस्थिती असताना एका समाजातील व्यक्तीने अ ब क ड या अटी व शर्ती शितील करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना रीतसर मागणी केली असताना तसेच उपविभागीय अधिकारी यांनी खनिकर्म अधिकारी यांना अ ब क ड याबाबत रीतसर मार्गदर्शन मागितले असताना खणीकर्म अधिकारी यांनी अ ब क ड यावरती मार्गदर्शन देणे जरुरीचे असताना महाराष्ट्र शासनाने काढलेल्या दि. 2 -3 – 2022 च्या राजपत्राच्या व शासनाच्या परिपत्राच्या अनुषंगाने निर्णय घेण्याबाबत कळविले आहे.  उपविभागीय अधिकारी यांनी मागणी केलेल्या अ ब क ड या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन येणे अपेक्षित असताना तसेच अ ब क ड च्या अनुषंगानेच तहसीलदार यांना आदेश देणे अपेक्षित असताना शासन निर्णय शासन अधिसूचना व शासन परिपत्रके यामधील तरतुदीचे अवलोकन करून तत्काळ पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेश दिलेला आहे.
उपोषण करते यांनी दाखवलेल्या कागदपत्रांच्या अवलोकन केले असता वरिष्ठ कार्यालयाकडून यांत्रिक साधनांचा वापर करणे यावा किंवा कसे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन देणे आवश्यक असताना केवळ शासन निर्णय नमूद करून शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे बाबत कळविले आहे. हात फोडीने दगड फोडणाऱ्या समाजाच्या लोकांनी योग्य पद्धतीने अ ब क ड बाबत लेखी मागणी करून ही अधिकारी वर्ग फक्त कागदी घोडे नाचवून समाजातील लोकांची दिशाभूल करत आहेत.

तसेच उपोषणास बसलेल्या व्यक्तींनी मागणी केलेल्या अनुषंगाने त्यांना परवानगी देता येते किंवा नाही हे स्पष्ट केव्हा कळणार एखाद्या उपोषणकरित्याच्या जीवितास कमी जास्त झाल्यानंतरच याबाबत प्रशासनाला जाग येणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close