
कराड : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेऊन पालखी सोहळा उत्साहात, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच महिला वारकऱ्यांसाठी बंदिस्त स्नानगृहाची व्यवस्था करावी. ठरावीक अंतरावर आरोग्य पथके तैनात करावीत. त्याशिवाय फिरते आरोग्य पथकही उपलब्ध करून द्यावे. तसेच पालखी मार्गावर कायमस्वरूपी शौचालये व स्नानगृहे उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी जागा निश्चित कराव्यात, अशा सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिल्या. तसेच वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अशी सूचनाही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षक अदिती भारद्वाज, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, फलटण व खंडाळ्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह सबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.