
कराड : भानगड बाजाने स्वतःचा व घरच्यांच्या फायद्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धुळ फेक करून नांदलापूर व जखिनवाडी या दोन्ही गावातून काढलेल्या रेशन कार्ड वरती रहिवासी व उत्पन्नाचे दाखले काढून त्याच्या आधारे तहसील कार्यालयाकडून मुलासाठी नॉन क्रिमिलेअर व स्वतःसाठी उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे. तसेच पत्नी माध्यमिक शाळेवरती शिक्षिका असून त्यांना शासनाचा पगार चालू आहे, असे असताना या भानगड बाजाने साठ हजाराचा उत्पन्नाचा दाखला घेऊन स्वतःचा व घरच्यांच्या फायद्यासाठी त्याचा वापर करत आहे.
या भानगड बाजाने केलेल्या महाकाय भानगडी सगळ्या तालुक्याला माहित झाल्या आहे. तरी तो तहसील कार्यालयाच्या आवारात मोकाट सोडलेल्या जनावरासारखा फिरत आहे. त्याला अजून असेच वाटत आहे की मी केलेल्या भानगडी अजून कोणाला माहित नाहीत व माझा याच्याशी काहीच संबंध नसल्याचा दाखवत आहे असे असताना हा भानगडबाज हातात कागदपत्रे घेऊन पुरवठा व सेतू कार्यालयात अजून फेऱ्या मारत आहे. तरी या भानगड बाजाने व त्याच्या घरच्यांनी कोणत्याही कार्यालयात कागदपत्रे देऊन काहीही कागदपत्रे काढत असतील तर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ती व्यवस्थित पडताळणी करावी, नाहीतर तो स्वतःच्या व घरच्यांच्या फायद्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणण्यास मागे सरणार नाही. यासाठी त्याच्या व त्याच्या कुटुंबातील लोकांच्या बाबत सर्वांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
तसेच अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या भानगड बाजाने त्याच्या मुलासाठी 2023 मध्ये काढलेल्या नॉन क्रिमिलियरचा दाखला व 2024 मध्ये त्याच्या नावे काढलेला उत्पन्नाचा दाखला हे दाखले कोठे कोठे वापरले आहेत तसेच त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव या रेशन कार्ड वरून कमी न करता दुसरे रेशन कार्ड कसे काढले तसेच दुसरी पत्नी माध्यमिक शाळेवरती शिक्षिका असताना त्यांना शासनाचा पगार असताना उत्पन्नाचा दाखला साठ हजाराचा घेऊन त्याचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे तसेच बाकीच्या मुलांच्या शिक्षणासाठी अथवा मुलांच्या व पत्नीच्या नोकरीसाठी अजून किती दाखले शासनाची व अधिकारी कर्मचारी यांची फसवणूक करून स्वतःच्या व कुटुंबाच्या फायद्यासाठी वापरली आहेत. यासाठी या भानगड बाजाची व त्याच्या कुटुंबाची चौकशी करून याबाबत कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
क्रमश :