
कराड : भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते उध्वस्त केले आहेत. भारताच्या या ऑपरेशन “सिंदूर”नंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. त्यानुसार कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात विविध सोशल मिडिया, सामाजिक संघटना, विविध संस्था, श्री शिवप्रतिष्ठान व नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, पेढे वाटप करून जल्लोष साजरा केला आहे.
काही दिवसांपूर्वी पेहेलगाम (कश्मीर) येथे अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला होता. यामध्ये अनेक नागरिक, पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युउत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानात घुसून बदला घेत अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. या हल्ल्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात जल्लोष व्यक्त करण्यात आला.
त्यानुसार कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात भारत माता की जय, वंदे मातरम् , छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जला दो जला दो, पाकिस्तान जला दो’ आदी घोषणाबाजी करत अनेक सोशल मिडिया ग्रुप्स, सामाजिक संघटना, विविध संस्था, श्री शिवप्रतिष्ठान व नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच पेढे वाटप करून जल्लोष साजरा केला.