कराड ः कराड बस स्टॅण्ड परिसरात शुक्रवारी कुंडलच्या प्रवाशाचा मोबाईल हरवला होता. हा हरवलेला मोबाईल रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवून संबंधित व्यक्तीस परत केला. या प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक शाखेकडून रिक्षाचालकाचा बुके देऊन सत्कार केला.
कुंडल जि. सांगली येथील अशोक राजाराम लाड यांचा शुक्रवार दि. 16 रोजी कराड बस स्टॅण्ड परिसरात हरवला होता. दरम्यान, बस स्टॅण्ड परिसरात रिक्षा चालक संतोष दिलीप ताटे हा त्याच्या रिक्षा मधील प्रवासी सोडण्यासाठी बस स्टॅण्ड परिसरात आला होता. यावेळी त्यास रस्त्यावर एक मोबाईल पडलेला दिसला. तो मोबाईल त्याने धर्मवीर संभाजी रिक्षा गेट कराड संघटनेचे अध्यक्ष फिरोज कच्ची यांच्याकडे देवुन त्यांनी सापडलेल्या मोबाईल मधील आलेल्या शेवटच्या फोन नंबरवरुन संपर्क करुन मोबाईल मालकाचा शोध घेवुन त्यांना मोबाईल परत केला.
रिक्षा चालक संतोष दिलीप ताटे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस हवालदार सुरेश सावंत, संतोष पाटणकर तसेच रिक्षा संघटनेचे मुसा शेख, रमजान कागदी, गफार नदाफ आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.