
कराड : महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 12/12/2013 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने गौण खनिज उत्खनन करण्यासाठी तात्पुरते परवाने देण्याबाबत शासनाकडून पत्रक काढण्यात आले होते. परंतु या पत्राच्या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायालयाने दिनांक 17/2/2022 रोजी दिलेल्या निर्णयात पर्यावरणाची अनुमती शिवाय तात्पुरते गौण खनिज उत्खननाचे परवाने देण्यात येऊ नये असा निर्णय दिला होता. त्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून दिनांक 20/10/2022 रोजी पत्र काढून दिनांक 24/3/2022 चे पत्र रद्द केलेले असल्यामुळे तत्परवीचे गौण खनिजाचे तात्पुरते परवाने देण्याबाबतचे शासन निर्णय परिपत्रक व पत्रान्वये तसेच संदर्भाधीन क्रमांक 1 दि. 12/12/2013 च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सूचना कायम राहत असून त्या अनुषंगाने संबंधित सर्व शासकीय विभागांनी गौण खनिज उत्खनना बाबतचे अल्प/तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करावी अशी सूचना दिलेली आहे.
असे असतानाही मौजे नांदलापूर गावाने कराड तालुक्यातून सर्वात जास्त गौण खनिजाचा महसूल दिला असतानाही सध्या नांदलापूर येथील गट नंबर 409 मधील खाजगी क्षेत्रातील दहा खाणी बंद आहेत. यातून शासनास एक रुपयाचाही महसूल मिळत नाही. 2020 पर्यंत या सर्व खाणी चालू होत्या. परंतु दिनांक 17/2/2022 रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण खंडपीठ पुणे यांनी दिलेल्या निर्णयामुळे पर्यावरण अनुमती शिवाय तात्पुरते गौण खनिज उत्खनन परवाने देण्यात येऊ नये असा निर्णय दिला होता. त्यावेळी नांदलापूर येथील गट नंबर 409 मधील खाजगी क्षेत्रातील जागेमधील गौन खनिज उत्खनन करण्यासाठी तात्पुरते परवाने मिळावे म्हणून काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज देऊन उत्खननासाठी परवानगी मागितली होती. परंतु जिल्हा अधिकारी कार्यालयातून पर्यावरण अनुमतीशिवाय तात्पुरते गौण खनिज उत्खनन परवाने देण्यात येऊ नये असे आदेश दिलेले आहेत. आपले अर्ज प्रकरण अपूर्ण आहे पर्यावरणाची अनुमती प्राप्त करून घेऊन मर्जी तर फेर अर्ज सादर करावा असे पत्र या लोकांना दिनांक 12/5/2022 रोजी देण्यात आले आहे.
ज्यावेळी काही लोकांनी नांदलापूर येथील गट नंबर 409 मधील खाजगी क्षेत्रातून गौण खनिज उत्खननासाठी तात्पुरता परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण खंडपीठ पुणे यांच्या निर्णयामुळे प्रशासकीय अधिकारी यांनी या लोकांची मागणी फेटाळली होती. परंतु वरिष्ठ न्यायाधिकरणाने दिनांक 14/10/2022 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने कराड तालुक्यात नांदलापूर सोडून सगळीकडे तात्पुरते परवाने देऊन गौण खनिज उत्खनन केले जाते त्याच प्रकारे प्रशासकीय अधिकारी मौजे नांदलापूर येथील गट नंबर 409 मधील खाजगी क्षेत्रातील गौण खनिज उत्खनन करण्यासाठी तात्पुरता परवाना देणार का
तसेच काही लोकांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यामुळे नांदलापूर येथील क्षेत्रातील गौण खनिज उत्खनन करण्यासाठी तात्पुरते परवाने दिले जात नाहीत असे बोलले जात आहे. तरी मौजे नांदलापूर येथून मोठ्या प्रमाणात शासनास महसूल मिळत असेल तर त्याची आवश्यकता प्रशासनाला आहे की नाही याबाबत प्रशासन गांभीर्याने पाहणार की नाही हा येणारा काळच ठरवेल असे बोलले जात आहे.
क्रमशः
पुढील भागात
नांदलापूर येथील शासकीय खाणींच्या लिलावा बाबत