ताज्या बातम्याराजकियराज्य
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा झटका
काँग्रेससह युथ काँग्रेसची बँक खाती गोठवली

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेससह युथ काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. त्यांनी म्हटलं, सध्याच्या घडीला आमच्याकडं खर्चासाठी पैसा नाही. आम्हाला कुठलीही बिलं भरता येत नाहीएत, तसेच आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार देता येत नाहीएत. सगळ्याचं गोष्टींवर परिणाम झाला आहे. केवळ भारत जोडो न्याय यात्राच नव्हे तर आमच्या सर्वच राजकीय कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.