
कराड : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कार्यस्थळावर नवीन आठ हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. या हायमास्ट दिव्यांच्या प्रकाशात कृष्णा कारखान्याचा परिसर उजळून निघाला आहे. याचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
कृष्णा कारखान्याच्या कार्यस्थळावर पूर्वी चार हायमास्ट दिवे होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी नवीन आठ हायमास्ट दिवे बसवण्यात आल्याने, आता एकूण १२ हायमास्ट दिव्यांमुळे कृष्णा कारखान्याचा परिसर उजळून निघाला आहे.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक संजय पाटील, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, शिवाजी पाटील, अविनाश खरात, विलास भंडारे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, वैभव जाखले, रंजन दातार, अनिल पाटील, ऋषिकेश दातार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.