
कराड : अथणी शुगर्स लि. रयत युनिट शेवाळेवाडी (म्हासोली) ता, कराड जि, सातारा कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२५-२६ साठी दि. ३० रोजी अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ करणेत आला.
सदर कार्यक्रमासाठी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह (दादा) पाटील, अथणी शुगर्सचे एक्झिकेटीव्ह डायरेक्टर योगेश पाटील, रयत युनिटचे युनिट हेड रवींद्र देशमुख, सर्व संचालक, खातेप्रमुख यांचे उपस्थितीत पार पडला.
यावेळी वाहतूक कंत्राटदार अभिजीत रामचंद्र पाटील, प्रकाश रंगनाथ पाटील, अजितकुमार नथुराम यमगर, आनंदा किसन कडव, भगवान जगन्नाथ गायकवाड, प्रदिप जालिंदर पाटील, भिकाजी रावसाहेब मोरे इ. वाहन मालक यांनी करार केले. कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२५-२६ करीता ७.०० लाख मे. टनाचे उदिष्ट असून त्यादृिष्टने वाहन मालकांनी कारखान्याकडे तोडणी वाहतूक करार करावा तसेच ऊस उत्पादक शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवून सहकार्य करण्याबाबत आवाहन कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील (दादा) यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास कारखान्यातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्व वाहनमालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत रयत युनिटचे मुख्य शेतीअधिकारी श्री. विनोद पाटील यांनी केले.