
कराड ः राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथील शासकीय आशाकिरण महिला वसतिगृहातील निराधार महिलांना जयमाला बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात ओले.
आ. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन आठवड्यापासून कराड तालुक्यातील व कराड उत्तर मतदारसंघातील विविध गावांमध्ये आरोग्य शिविर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने शासकीय आशाकिरण महिला वसतिगृहातील निराधार महिलांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. जयमाला पाटील यांनी वसतिगृहातील प्रवेशितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच वसतिगृहामध्ये महिलांना पुरविण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत माहिती घेत कमतरता असलेल्या सोयी पूर्ण करण्याबाबत आश्वासित केले. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी या ठिकाणी रहात असलेल्या इच्छुक मुलींना पुढील वर्गामध्ये प्रवेश देऊन शिक्षणाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्यासाठीचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
वसतिगृहातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय स्टाफ आहे का याची खात्री करून घेतली, निराधार माता-भगिनींच्या पाठीवरून मायेचा हात फिरविला. या सर्व बाबींमुळे उपस्थित माता- भगिनींनी सी. जयमाला पाटील यांचे प्रती ऋण व्यक्त केले व आभार मानले.
याप्रसंगी सुशीला भीमराव पाटील, आशा अशोकराव पाटील, श्रीमती प्रभावती माळी, श्रेया संग्राम लादे, वसतिगृहाचे अधिक्षक अविनाश म्हासुर्णेकर, सहा.अधिक्षक माणिकराव शिंदे, अधिपरिचारिका अनिता चव्हाण उपस्थित होते.