
कराड : आषाढी एकादशीनंतर पंढरपूरहून परतीचा प्रवास करत कोळे ता.कराडकडे पायी चालत येणारी श्री संत गाडगेनाथ महाराज आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्याचे सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर टाळ मृदुंगाच्या गजरात उत्साहपूर्ण वातारणात आगमन झाले, यावेळी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांनी दिंडी सोहळ्याचे स्वागत केले, तसेच पालखीचे आणि येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले व तसेच वारकऱ्यांशी संवाद साधला.
प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि नडशी ग्रामस्थ यांच्यावतीने हजारो भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पालखी सोहळ्यातील उपस्थित भाविक भक्तगण आणि नडशी ग्रामस्थांच्यावतीने माननीय जशराज पाटील यांचे मानाचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी नडशी भजनी मंडळाचे भजन झाल्यानंतर महाआरती करण्यात येवून, नंतर दिंडीभोवती गोल रिंगण घालण्यात आले.
याठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ शारदा पाटील, गोविंदराव थोरात, पांडुरंग थोरात, शंकरराव पाटील, सिद्धनाथ थोरात, माणिकराव थोरात, बाजीराव थोरात (नांगरे), अमृतराव थोरात, अशोक थोरात, शामराव नाना थोरात, मुगुटराव थोरात (नांगरे), आनंदराव संभाजी थोरात, आनंदराव बाबुराव थोरात, मंगेश पाटील, लक्ष्मण यादव, शंकर मारुती थोरात, शंकर उत्तम थोरात, विश्वास थोरात, भगवान थोरात, निवास पाटील, गणेश नलवडे, संभाजी उर्फ तात्यासो थोरात, राहूल थोरात, राजेंद्र जाधव, सिद्धार्थ चव्हाण, दत्ता शेलार, धैर्यशील पाटील, गणेश चव्हाण यांचेसह सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व नडशी, यशवंतनगर, उत्तर कोपर्डे, कोपर्डे हवेली, शिरवडे, शहापूर, पिंपरी, तासवडे, वडोळी निळेश्वर व पंचक्रोशीतील वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ, मृदुंग व हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला.