
कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कापील गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार उर्फ गोल्डन मॅन यांनी आपल्या कापील, गोळेश्वर, मलकापूर, नांदलापूर, जखिणवाडी, आटके, कालवडे येथील असंख्य कार्यकर्त्यांसह रविवारी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, अजितराव पाटील – चिखलीकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, पैलवान नानासाहेब पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, ॲड. नरेंद्र नांगरे – पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराडच्या माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, माजी उपनगराध्यक्ष फारुख पटवेकर, प्रदीप जाधव, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, गितांजली थोरात, शंकरराव खबाले, रोहित पाटील, नामदेव पाटील, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे, नितीन थोरात, एकनाथराव तांबवेकर, डॉ. सुधीर जगताप, उदय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.