राज्यसातारा

लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड

सचिव ला.श्रीपाल ओसवाल तर खजिनदार ला.गिरीश शहा ; 2 जुलै रोजी होणार पदग्रहण समारंभ 

कराड : लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबच्या सन 2025 – 26 या वर्षासाठी अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच सचिवपदी ला.श्रीपाल ओसवाल तर खजिनदारपदी ला.गिरीश एम. शहा यांची निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ऑफ कराड मेन क्लबच्या संचालक मंडळ व सर्वसाधारण सभेत ला.संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करण्यात आल्या.
समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी लायन्स इंटरनॅशनल ही संघटना जागतिक पातळीवर काम करत आहे. या संघटनेचा विस्तार 214 देशात असून याची सदस्य संख्या 14 लाखापेक्षा अधिक आहे. लायन्स इंटरनॅशनल संघटनेच्या माध्यमातून गरजूंना अनेक वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संघटनेच्या या कार्यामुळे गरजूंना मोठा आधार मिळतो आहे.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करत असलेल्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबची वाटचाल सुरू आहे.
कराड मेन क्लबच्या माध्यमातून कराड पाटणसह परिसरात अनेक सामाजिक उपक्रम व वैद्यकीय सेवा पुरवल्या जात आहेत.
लायन्स इंटरनॅशनलच्या रिवाजाप्रमाणे बुधवार दि.2जुलै रोजी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ कराड येथील हॉटेल पंकज येथे होणार आहे.  या कार्यक्रमास पदप्रदान अधिकारी म्हणून पुणे प्रांताचे माजी प्रांतपाल MJF ला.राज मुछाल तर शपथ प्रदान अधिकारी फलटणचे MJF ला.मंगेश दोशी उपस्थित राहणार आहेत. तसेच रिजन चेअरमन ला.नीलम लोंढे पाटील व झोन चेअरमन ला. वृषाली गायकवाड यांचे सह लायन्स परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close