
कराड : कराड तालुक्यात दोन विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. दोन विधानसभा मतदार संघ असल्यामुळे कामाचे व्याप ही तेवढेच मोठे आहे. असे असताना सध्या तालुक्यातील काही तलाठ्यांच्या बदल्या तालुका बाहेर करण्यात आलेल्या आहेत. परंतु जेवढे तलाठी कराड तालुक्यातून बाहेरगावी गेलेले आहेत तेवढे तलाठी कराडमध्ये आलेले नाहीत. त्यामुळे कित्येक तलाठ्यांना दोन ते तीन गावांचा कारभार एकट्यालाच पहावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे दाखले हे काम करत असताना शासनाने काढलेल्या अनेक सरकारी योजनेसाठी जी कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे मिळवण्यासाठी तलाठ्यांच्या ऑफिस बाहेर लोकांची गर्दी पाहिला मिळत आहेत.
एका तलाठ्याने दोन ते तीन गावे सांभाळायची हे काय वाटते तेवढे सोपे नाही. परंतु त्यांच्या हाताखाली असलेले कोतवाल यांच्यामुळे त्यांना थोडीफार मदत होत असते. तरी अण्णासाहेब दुसऱ्या गावामध्ये व्यस्त असले तरी त्या गावातील कोतवाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांची कामे करत असतात. त्यामुळे लोकांना कागदपत्रे मिळण्यासाठी कोणताही त्रास वाटत नव्हता.
परंतु गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यातील साधारण 22 कोतवालांच्या तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये काम करण्यासाठी आदेश काढलेले आहेत. काही तलाठी यांच्याकडे दोन ते तीन गावांचा चार्ज असताना तसेच शासनाने काढलेल्या काही योजनेबाबत लागणारे कागदपत्रे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले देताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशावेळी गावातील कोतवालांची तहसील कार्यालयामध्ये काढलेले आदेश योग्य आहेत का अशी चर्चा सध्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये चालू आहे. गावातील लोकांना त्यांना हवी असणारी कागदपत्रे मिळाली नसल्याने काही लोकांना शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची भीती वाटत आहे.
शासनाने काढलेल्या योजनेबाबत काही लोकांना कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत म्हणून ते योजनेपासून वंचित राहिल्यास व विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या वेळेस कागदपत्रे उपलब्ध झाली नाही तर या सर्वास जबाबदार कोण ?
क्रमश :