
कराड ः हिंगोली जिल्ह्यात तलाठी संतोष देवराज पवार यांची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचा कराड तालुका तलाठी संघटनेच्यावतीने आज निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देऊन एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, तलाठी संतोष पवार यांचा शासकीय कामकाज करत असताना भरदिवसा तलाठी कार्यालयात संशयितांने चाकूने भोकसून खून केला. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा प्र्रकारे सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदणीय व घृणास्पद आहे. आरोपीला कठोरातील कठारे शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी तलाठी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचारी यांचे खच्चीकरण झाले असून अतिशय तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी हे घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी या दृष्टिने पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून व तज्ञ विधिज्ञामार्फत कायद्यानुसार कमाल शिक्षा देण्यात यावी. मयत तलाठी यांच्या परिवाराला 50 लाख रूपयांची विशेष तात्काळ मदत शासनाने जाहीर करावी. भविष्यात त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वारसांना अनुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत समाविष्टट करून घ्यावे. तसेच राज्यात कलम 353 अजामिनपात्र गुन्हा हा जामिनपात्र करण्यात आला आहे. या सारख्या घटना घडू नयेत व सरकारी कर्मचाऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले होऊ नयेत यासाठी कायद्यात दुरूस्ती करून कलम 353 हे अजामिनपात्र करण्यात यावे. एवढेच नव्हे तर यासारखे इतर काही कायदे अस्तिवात आणून कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबाबत गांभिर्याने विचार व्हावा व संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी कराडचे तहसीलदार कल्पना ढवळे यांना कराड तालुका तलाठी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी तलाठी, सर्कल उपस्थित होते.
Tags
Karad Tahsil office