
कराड ः पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथील सुझलॉन कंपनीच्या सुपरवायझरला कुऱ्हाडीचा धाक दाखवून पवनचक्कीची कॉपर केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी जेरबंद झाली आहे. ही कारवाई उंब्रज पोलिसांनी केली असून याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे साडे पंधरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अनिल लक्ष्मण पवार, सुरेश बडू निकम दोघे (रा. म्हारखंड ता. पाटण) दादासो बळीराम सपकाळ (रा. बागलेवाडी ता. पाटण), प्रकाश गुलाबराव जाधव (रा. कळंबे रा. पाटण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून टेम्पो ट्रॅव्हलर, कॉपर वायरचे तुकडे, कुऱ्हाड, लाकडी दांडके, वायर कटर असा सुमारे पंधरा लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार 30 ऑक्टोबर रोजी रात्री 2.45 चे सुमारास सडावाघापूर येथील सुझलॉन कंपनीचे साईट वरील मौजे जांभेकरवाडी ता. पाटण येथील कंपनीचे सुपरवाझर फिर्यादी व साक्षीदार हे पवनचक्की असणारे परिसरामध्ये पेट्रोलींग करीत असताना त्यांना कंपनीचे इंजिनिअर यांचा फोन आला त्यावेळी त्यांनी सांगितले की, एस 96 या मशीनची कनेक्टीव्हीटी गेलेली आहे. असे सांगितलेने त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी एस 96 या टॉवरचे मशीन जवळ जावून पाहिले असता त्यांना कॉपर केबल कट केलेली दिसली ते कॉपर केबलचा शोध घेत असताना पहाटे 03.30 वा. चे सुमारास सदर ठिकाणचे बाजूस असले ओढ्यामध्ये टॉवरची कट केलेली केबल 7 ते 8 इसम उचलून घेवून जात असताना दिसलेने त्यांनी त्यांना हटकले असता सदर इसमांनी त्यांचेवर कुन्हाड उघारून अंगावर धावून आलेने ते सर्वजण भयभित झाले त्यामुळे ते परत फिरलेवर संतोष मुळीक यांनी डबल 112 ला तसेच उंब्रज पोलीस स्टेशनला फोन करून सदरची घटना पोलीसांना सांगितलेने लागलीच सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी पोलीस टीम तयार करून पसार झालेले आरोपीचा शोध घेणे कामी योग्य सूचना देवून मार्गदर्शन केलेने, त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पो. हवा. सचिन जगताप, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. निलेश पवार तसेच राहुल पुजारी पोलीस पाटील ढोरोशी, अधिकराव पवार पोलीस पाटील जळव, विजय मारुती कदम पोलीस पाटील जांभेकरवाडी यांनी गावातील पोलीस मित्र सोबत घेवून येवून त्यांचे सहकार्याने पाळून गेले आरोपींचा शोध घेत असताना जवळ खिंडी जवळ टेम्पो उभा दिसला. सदर ठिकाणी एक आरोपी दबा धरुन बसलेला दिसलेने त्यास ताब्यात घेवून इतर पळून गेले पैकी काही आरोपीचा शोध रात्रीचे वेळी घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणेत आला आहे. तसेच जबरी चोरी करुन पळून गेलेले 3 आरोपींचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे करीत आहेत.