
कराड : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यावर वाहन तपासणी दरम्यान चोरलेल्या दुचाकीला बनावट नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या संशयीतास पोलिसांनी दुचाकीसह गजाआड केले.
संदीप अकुंश वाघमारे (वय २८) रा. कोळेवाडी, ता. कराड) असे संबधिताचे नाव आहे. काल रात्री कारवाई उशिरा कारवाई झाली. वाहतूक शाखेचे हवालदार अमोल पवार, राजाराम जाधव, गोकुळ हादगे व राजू घाडगे यांनी कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ढेबेवाडी फाटा येथे वरील चोघेही हवालदार वाहतूकीची ड्युटी करत होते. त्यावेळी त्यांना एक तरूण वेडी वाकडी वळण घेत वेगात दुचाकी घेवून येताना दिसला. त्यांनी त्याला त्वरीत अडविले. त्याच्याकडे वाहनाची कागदपत्रे व त्याचा परवाना विचारला. त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तेर दिली. त्याचेवळी त्याने मद्य प्राशन केल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. त्याच्याकडे स्पेंल्डर दुचाकी होती. त्याचीही त्याला नीट माहिती सांगता आली नाही. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी त्या दुचाकीची ऑनलाईन माहिती घेतली. त्यावेळी ती दुचाकी हिंदुराव येडके यांची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्वरीत त्याच्यांशी संपर्क साधला. त्यावेळी येडके यांनी त्याची दुचाकी महिन्यापूर्वीच चोरीस गेल्याचे सांगितले. त्याबाबत शिराळा पोलिसात तक्रारही दिली आहे. त्यानुसार संशयीताने ती दुचाकी चोरल्याचे पुढे आले. त्याला त्वरीत अटक करण्यात आली. त्याच्याकडून अजूनही काही दुचाकी मिळू शकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, सहाय्यक फौजदार संतोष कोळी, राजू घाडगे, पोलिस अंमलदार राजाराम जाधव, अमोल पवार, प्रशांत शेवाळे, देशमुख यांचे सह वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी यांनी केली.