ताज्या बातम्याराजकियराज्य

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महादेव जानकरच उमेदवार असणार ?

पुणे : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना रासप चे अध्यक्ष महादेव जानकर हे शरद पवार यांना अनेकदा भेटत होते. यामुळे ते शरद पवार यांच्याकडे येणार असल्याची माहिती होती. असे असताना मात्र आता ते भाजपकडेच राहणार असक्याचे दिसून आले आहे. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

महादेव जानकर हे माढा आणि परभणी या दोन मतदारसंघांसाठी आग्रही असल्याचे बोलेले जात होते. आता मात्र जानकर यांच्याकडे बारामतीत पर्याय म्हणून पाहिले जात आहे. यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महादेव जानकरच उमेदवार असणार, अशी माहिती आहे.

सध्या बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना मानला जात आहे. मात्र जर ऐनवेळी अजित दादांनी राजकीय खेळी करत महादेव जानकर यांना बारामतीतून लढण्यास सांगितले, तर वेगळे चित्र बघायला मिळेल. यामुळे पवारांना विरोध करणाऱ्या अनेकांना गप्प राहावे लागेल.

याठिकाणी विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना विरोध केला आहे. भोरमध्ये देखील अजित पवारांना विरोध असल्याचे चित्र आहे. यामुळे आता जर जानकर बारामतीतून लोकसभेचे उमेदवार झाले, तर एका दगडात अनेक पक्षी मारले जातील, यामुळे फडणवीस याबाबत रणनीती ठरवत आहेत.

दरम्यान, जानकर यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली आणि आपण महायुतीत असल्याचे सांगितले. आता ते परभणीतून, माढ्यातून की बारामतीतून लढणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. मात्र याबाबत अनेकांनी बारामती असं बोलून दाखवलं आहे.

२०१४ निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना चांगली टक्कर देत मोठी मते मिळवली होती. तेव्हा थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता. यामुळे या निवडणुकीत जानकर यांचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close