राज्यसातारासामाजिक

येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी

पाल येथे यात्रा पूर्व नियोजन बैठकीत प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कराड ः गतवर्षीच्या यात्रेमध्ये ज्या ज्या त्रुटी यात्रेदरम्यान ज्या ज्या शासकीय विभागाला जाणवल्या त्या त्रुटी दूर करून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन सर्वांच्या समन्वयातून यात्रा निर्विघ्न पार पाडावी असे मत प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी व्यक्त केले.
पाल (ता-कराड) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा देवाची यात्रा 11जानेवारीला होत आहे त्यासाठी आयोजित यात्रा पूर्वनियोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी कराड उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील सातारा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष सुरेश पाटील सरपंच सुनीता घाडगे उपसरपंच गणेश खंडाईत यात्रा कमिटीचे चेअरमन प्रशांत दळवी ग्रामपंचायत सदस्य शिवराज पाटील सुनील काळभोर कल्याणी इंजेकर प्रकाश जगताप हरीष पाटील अरुण जगदाळे धनंजय घाडगे कुमार काळभोर बाजार समिती संचालक उद्धवराव फाळके  मार्तंड देवस्थान ट्रस्टचे व्हाईस चेअरमन उत्तम गोरे संजय काळभोर आप्पासो खंडाईत सह्याद्रीचे माजी संचालक भास्करराव गोरे शंकरराव शेजवळ प्रशांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती
पुढे ते म्हणाले यात्रेच्या अनुषंगाने सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यात्रेमध्ये काम करण्याच्या निमित्ताने देवाची ही सेवा करता येणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली सेवा प्रामाणिकपणे करावी व पुढच्या मिटींगच्या आत जि जि कामे सांगितले आहे ती पूर्ण करावी.
यावेळी विविध विभागांचा आढावा घेताना विद्युत महावितरण मार्फत 30 कर्मचाऱ्यांची टीम यात्रेदरम्यान ठेवण्यात येणार आहे तसेच यात्रेदरम्यान विद्युत पुरवठा खंडित होणार नाही तसेच मिरवणूक मार्गात विद्युत तारांचा अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाईल यात्रेदरम्यान स्टँडबाय ट्रान्सफॉर्म ठेवण्यात येणार असल्याची सांगण्यात आले.
उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत यात्रेदरम्यान बेकायदेशीर वाहनांवर कारवाही करण्यात येणार आहे तसेच तीन क्रेन यात्रे दरम्यान ठेवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत यात्रेदरम्यान 300 ते 350 बसेस ठेवण्यात येणार आहेत पुणे मुंबई कोल्हापूर येथून थेट बसेस यात्रे करून साठी ठेवण्यात येणार आहेत तात्पुरते बस स्टॅन्ड गावाच्या कामानी जवळ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यात्रेच्या मुख्य दिवशी 24तास शटल सेवा ठेवण्यात येणार आहे येणार्या भाविकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन खात्यामार्फत यात्रा मिरवणूकीत येणाऱ्या मानकर्यांच्या जनावरांची तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट दिली जाईल आरोग्य विभागामार्फत 9ते16 जानेवारीपर्यंत 10 वैद्यकीय अधिकारी 24आरोग्य सेवक 74 कर्मचारी व पुरेसा औषध साठा यात्रे दरम्यान ठेवण्यात येणार आहे तसेच 11 रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत गावातील आत्तापासूनच पाणी स्रोतांची तपासणी सुरू असून पाणी पिण्यास योग्य असेल तेच पाणी स्त्रोत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गावात येणाऱ्या सर्व रस्त्यावरील खड्डे मुजवून रस्त्यावर येणारी झाडे झुडपे तोडावीत रस्ते सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांनी यावेळी दिल्या.
पाटबंधारे विभागामार्फत यात्रा कालावधीत पाल गावाच्या वरील 6 बंधारे आहेत या बंधाऱ्यावर प्रत्येकी 3कर्मचारी देखरेख करण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत तसेच पाल गावाच्या खालील बंधाऱ्यातील गाळ करण्याच्या सूचना प्रांताधिकार्यांनी संबंधित  अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्य उत्पादन शुल्क खट्यामार्फत यात्रा कालावधीत अवैद्य दारू धंद्यावर कार्यवाही केली जाईल यात्रेच्या मुख्य दिवशी पाल व परिसरातील दारू दुकाने बंद ठेवण्यात येतील यावेळी ग्रामस्थांनी उंब्रज वरून येऊन पाल गावामध्ये बेकायदेशीर ताडी विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली.
पोलीस विभागामार्फत यात्रेदरम्यान पाच पोलीस सेक्टर केली आहेत 50 अधिकारी 650 पोलीस व होमगार्ड असणार आहेत मानकरी व प्रमुखांना पासेस देण्याचे काम सुरू केले आहे गावात येणाऱ्या पाच ही रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी पार्किंगची सोय केली जाणार आहे स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर वाळवंट व मराठी शाळा अशा तीन ठिकाणी पोलिस चौकी यात्रेदरम्यान असणार आहेत.
देवराज पाटील म्हणाले सर्वांच्या सहकार्याने व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निधीतून पाल गावच्या कमानी पासून ते आदर्श नगर पर्यंत स्ट्रीटलाईटचे काम पूर्ण झाले आहे तसेच मिरवणूक मार्गावरील पुलाचे कामही पूर्ण झाले आहे माजी आमदार बाळासाहेब पाटील वाढदिवस समितीने 30के.वी.चा जनरेटर खंडोबा देवस्थान साठी भेट दिला आहे त्यामुळे यात्रा कालावधीत याचा फायदा होणार आहे. देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत शासकीय अधिकारी ग्रामस्थ भाविक सर्वांच्या सहकार्याने यात्रा सुरळीत पार पाडावी.
तहसीलदार ढवळे म्हणाल्या महसूल प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत कंट्रोल रूम मध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आप आपले प्रतिनिधी ठेवावेत यात्रेदरम्यान कोणतीही दुर्घटना घडल्यास प्रत्येक विभागाशी संपर्क साधता येईल.
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी शासकीय अधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले तर आभार शंकरराव शेजवळ यांनी मानले.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close