
कराड ः कै. स्वा. सै. शामराव पाटील (आण्णा) यांचे पुण्यतिथी स्मरणार्थ शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत के. स्वा. से. दादासो उंडाळकर स्मारक, कराड-चांदोली रोड, उंडाळे ता. कराड येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करणेत आले असलेची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी दिली.
या महारोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील 60 हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग होणार असून इयत्ता पाचवी ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतलेल्या कराड तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख यांचे शुभहस्ते होणार असून सदर मेळाव्याकरीता निवड झालेल्या उमेदवारांना कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर यांचे हस्ते तात्काळ नियुक्तीपत्र देणेत येणार आहे. उमेदवारांनी https://shorturl. at/4N8VL या लिंकवर आपली नोंदणी करणेत यावी तसेच आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या पाच प्रति, दोन पासपोर्ट साईझ फोटो घेवून उपस्थित रहावे असे अवाहन ॲड. उदयसिंह पाटील यांनी केले.
तसेच शनिवार दि. 4 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5-00 वाजता स्व. लोकनेते विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या 4 थ्या पुण्यतिथी स्मरणार्थ या वर्षापासून उंडाळे ता. कराड येथे विविध समाजउपयोगी उपक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. असून सदर समारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवासजी पाटील यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करणेत येणार असून समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ. जयंतरावजी पाटील व माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची महिती ॲड. उदयसिंह पाटील यांनी दिली.