
कराड : कराड उत्तर मधील या तमाम माता बहिणीचा भाऊ म्हणून लाडक्या बहिणीचा आशीर्वाद मनोजदादा घोरपडे यांचा पाठीमागे आहे. त्यांना कोणीही अडवू शकणार नाही असे प्रतिपादन आ. चित्राताई वाघ यांनी केले.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून मनोजदादा घोरपडे यांची भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल मत्त्यापुर येथे स्वाभिमानी महिला सुखी मंच यांच्या वतीने त्यांचा सत्कार, हळदी कुंकू, भाजप सदस्य नोदणी असा एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी समता घोरपडे, चित्रलेखा माने-कदम, तेजस्विनी घोरपडे, मंगलताई घोरपडे, प्रियाताई शिंदे, रीना घोरपडे, अंजलीताई जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या, या ठिकाणी आल्यानंतर खरोखर मला हेवा वाटतो मनोजदादांच्या पाठीमागे या कराड उत्तर मधील उपस्थित 25 हजार महिलांचे आशीर्वाद आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माता भगिनीचा आशीर्वाद असेल तर त्या माणसाला कधीही जीवनात काही कमी पडणार नाही.
यावेळी बोलताना आ. मनोजदादा म्हणाले, माझ्या विजयामध्ये उपस्थित माता-भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. ज्याप्रमाणे प्रचारात मी पायाला भिंगरी बांधली होती. त्याचप्रमाणे सर्व माता-भगिनी घरातून बाहेर पडून माझ्यासाठी प्रचार करत होत्या. स्वाभिमानी महिला सखी मंच माध्यमातून आजपर्यंत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत यापुढे सुद्धा स्वाभिमानी महिला सखी मंच माध्यमातून महिलांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. सस्वाभिमानी महिला सखी मंच कार्यक्रम आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर झालेले परंतु आजचा कार्यक्रम हा सर्वांत सरस आहे. इथून पुढे सुद्धा प्रत्येक वर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
यावेळी बोलताना चित्रलेखामाने कदम म्हणाल्या, कराड उत्तर मध्ये आ. मनोजदादा घोरपडे यांच्या विजयासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळेच मनोजदादांचा विजय साकार झाला.
यावेळी बोलताना प्रियाताई शिंदे म्हणाल्या, मनोजदादांचे महिलांसाठी असणारे कार्य खरोखरच खूप कौतुकास्पद आहे.
यावेळी बोलताना तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या, कराड उत्तर मधील माता-भगिनी म्हणजे आमचे कुटुंबच आहे. आणि या कुटुंबाची काळजी घेणे हे प्रामुख्याने आमच्या संपूर्ण घोरपडे कुटुंबियांची जबाबदारी आहे.
यावेळी समताताई घोरपडे म्हणाल्या, आमदार मनोजदादा हे जशे आमचे आहेत तसेच या संपूर्ण कराड उत्तर मधील माता भगिनींचे दादा आहे. आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये कायमच सोबत राहतील. त्याचबरोबर होम मिनिस्टर फेम दीपक साबळे यांच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाने महिलांची चांगलेच मनोरंजन झाले. विविध बक्षिसांची खैरात वाटण्यात आली. तेजल शिंदे, धनश्री काटकर यांच्या नृत्याविष्कारावरती उपस्थित महिलांनी एकच ठेका धरलेला होता.
यावेळी विश्रांती साळुंखे, विजया गुरव, सारिका निकम, पायल जाधव, स्वाती डहाणे, प्रतिभा कांबळे, सीमा घार्गे, रूपाली घाडगे, अमिता जाधव, यमुना जाधव, स्नेहल कांबळे, प्रभावती सूर्यवंशी, विजया पवार, सुनिता मगर, रूपाली मोहिते, शुभांगी माने, शशिकला जाधव, प्रज्ञा देशमाने, पल्लवी साळुंखे , सुजाता उपरे, राजश्री घार्गे, धनश्री सावंत यांच्यासह स्वाभिमानी महिला सखी मंच व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कराड उत्तर मधील माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
कराड उत्तर मधील माता भगिनींचे असणारे आशीर्वाद आज पर्यंत माझ्या सोबत आहेत. तिथून पुढे सुद्धा सर्व माता-भगिनींचे आशीर्वाद माझ्यासोबत राहावे ही आपल्या कडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व अडचणी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन.
– मनोजदादा घोरपडे
आमदार, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ