
कराड ः कराड तालुक्यातील आटके येथील नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आटके येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत येथील माणिकराव यशवंत पाटील (आण्णा) यांची आटके गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी व संभाजी यशवंत पाटील (आप्पा) यांची तंटामुक्ती उपाध्यक्ष पदी निवड झाली.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित तंटामुक्तीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा उदयसिंह पाटील (दादा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कोयना बँकेचे संचालक अजित पाटील पाटील, माजी उपसरपंच सुरेश पाटील, ज्येष्ठ नागरिक विजयसिंह पाटील, श्री. जालिंदर पाटील, श्री. पोपट पाटील, श्री. तानाजी पाटील, श्री. कुबेर पाटील व सर्व मान्यवर उपस्थित होते.