राजकियराज्यसातारा

कराड लोकशाही आघाडीचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

कराड : कराड लोकशाही आघाडीचे सभासद, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा स्नेह मेळावा उत्सव लॉन, कराड येथे आघाडीचे मार्गदर्शक आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी आघाडीचे पदाधिकारी, संघटक, कार्यकर्ते व नागरिक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर नागरिक बंधु-भगिनींचे आघाडीचे अध्यक्ष श्री. जयवंत पाटील (काका) यांनी स्वागत केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्री. नाना खामकर, श्री. मिलींद कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. पोपटराव साळुंखे, श्री. शिवाजी पवार, सौ. आशा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व येणा-या सर्व निवडणूकीसाठी आम्ही आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार काम करीत राहू व आमदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी खात्री दिली.
आमदार माननीय बाळासाहेब पाटील म्हणाले, सध्याच्या सरकारची सत्तेच्या जोरावर निवडणूका पुढे ढकलण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. सरकारने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेतल्या नाहीत त्यामुळे शहरांचा विकास थांबला आहे. विधानसभेच्या निवडणूकीनंतर शासनास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्याव्या लागतील. वॉर्ड रचना, आरक्षण व वॉर्ड किंवा प्रभाग यावर चर्चा होऊन निवडणूका लागतील. या निवडणूकीस आपण सर्वांनी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे आहे. सध्या जे शासन आहे त्यांनी जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटीची आकारणी केली असल्याने आपणांस महागाईचा सामना करावा लागत आहे. पदाधिकारी यांनी चांगल्या भावना व्यक्त केल्या आपली मते मांडली. त्या विचारांचा आदर केला जाईल. येणा-या निवडणूकीसाठी सर्वांनी एकसंघपणे आघाडीसाठी काम करावयाचे आहे. शहराच्या विकासासाठी काम करणारे नगरसेवक आपल्याला निवडून आणावयाचे आहेत त्यादृष्टीने आपण काम करावे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्री. सुभाषराव पाटील बोलताना म्हणाले की, आजचा मेळावा हा कराड नगरपरिषदेच्या अनुषंगाने आयोजित केला आहे. चांगल्या विधायक विचाराचे नगरसेवक पालिकेत निवडून यावेत अशी लोकशाही आघाडीची धारणा आहे. तरी आपण सर्वांनी विधानसभेनंतर होणा-या नगरपालिकेच्या निवडणूकीच्या दृष्टीकोनातून तयारीस लागावे.
यावेळी डॉ. अशोकराव गुजर, श्री. चंद्रकांत हिंगमिरे, श्री. संभाजीराव सुर्वे, श्री. आबा भोजगावकर, सौ. उमा हिंगमिरे, ॲड. विद्याराणी साळुंखे, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. दाऊद सुतार, श्री.शिवाजीराव कदम, श्री. सौरभ पाटील, श्री. सुहास पवार, श्री. शिवाजी पवार, श्री. शहाजी डुबल, श्री. शशिकांत पोळ, श्री. कांतीलाल जैन, श्री.राजेश मेहता, सौ. अनिता पवार,सौ. पल्लवी पवार, सौ. सुनंदा शिंदे, श्रीमती अरुणा जाधव, श्री. मोहसिन आंबेकरी, श्री. प्रविण पवार, श्री. राहुल खराडे, ॲड. सतिश पाटील, श्री. गंगाधर जाधव, श्री. अमृत देशपांडे, श्री. जयप्रकाश रसाळ, श्री. शामराव शिंगण आदि मान्यवर कार्यकर्ते बंधु-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
या स्नेह मेळाव्याचे सूत्र संचालन ॲड. प्रताप पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार आघाडीच्या उपाध्यक्षा ॲड. विद्याराणी साळुंखे यांनी मानले.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close