ताज्या बातम्याराजकियराज्य

राज्यात ऑपरेशन टायगर, काँग्रेसच्या बड्या नेत्याची पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना नेत्यासोबत भेट

मुंबई : राज्यात शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत अनेक नेते अन् पदाधिकारी शिवसेनेत सहभागी होत आहे. कोकणात शिवसेना उबाठाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे.

त्यानंतर आता शिवसेनेने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला आहे. पुण्यातील काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता शिवसेनेचे बडे नेते उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली.

राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर सक्रिय शिवसेनेकडून काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीसाठी सुरू झाल्या आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उदय सामंत यांची काँग्रेसचे पुण्याचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली. त्यांच्या सुपुत्राच्या आज वाढदिवस असल्याने एकत्र वाढदिवस आहे, असे त्यांनी म्हटले.

रवींद्र धंगेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स चर्चेत आले. त्यातूनही पक्ष सोडण्याचे संकेत मिळत आहे. या स्टेट्समध्ये रवींद्र धंगेकर गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो आहे. तसेच ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी. तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही…’ हे गाणे सोबत जोडले आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चांना पाठबळ मिळाले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close