प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर दोन मर्सिडीज घेऊन पदं मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याच आरोपांवरून आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. दरम्यान, आता पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत, विशेषत: जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांना वारवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत, किंवा ते तशाप्रकारचं वक्तव्य नेहमी करत असतात.
मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरच्या ज्या कमेंट आहेत, तशा कमेंट करणं योग्य नाहीये, त्यांनी देखील मर्यादा पाळायला पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना दिले होते, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की पदे मिळायची, असा खळबळजनक आरोप देखील नीलम गोऱ्हे यांनी या मुलाखतीत बोलताना केला.
तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असा दावाही नीलम गोऱ्हे यांनी केला. संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना नीलम गोऱ्हे यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला.
बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते.
मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.