
कराड : मलकापूर येथील भूखंड घोटाळ्यात काही समाजसेवकांनी उड्या घेतल्यामुळे हे प्रकरण भलत्या चर्चेत आले आहे. सध्याच्या युगात कोणी कोणासाठी आपला फुकट वेळ वाया घालवत नसतो त्याचप्रमाणे या भूखंड घोटाळ्यामध्ये निस्वार्थीपणे सेवा करणारा अवलिया कसा काय तयार झाला हा प्रश्न कराड तालुक्यात उपस्थित झाला आहे. जर निस्वार्थीपणे समाजसेवकाचे काम करायचे असेल तर या समाजसेवकाने लोकांच्याकडून अधिकार पत्र का लिहून घेतले असेल हा प्रश्न कराडकर यांना पडलेला आहे. जर फुकट जमीन घशात घालायला मिळाली तर कोणाला आवडणार नाही हेच गृहीत धरून काही समाजसेवकानी या प्रकरणात उड्या घेतलेले आहेत. मात्र हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही यामध्ये जसजसा अनेक गोष्टींचा उलगडा होत जाईल तसतसा या प्रकरणातील ट्विस्ट वाढत जाणार आहे. हे कराड करांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सध्या कमी वेळेत जास्त पैसे हे जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मिळत असल्याने जास्त लोकांचा ओढ हा या व्यवसायाकडे आहे. जर कोणी स्वतःचे पैसे एखाद्या जमिनीच्या व्यवहाराला लावले असतील व त्यामध्ये काही कोर्ट कचेरीच्या अडचणी आल्या असतील अथवा जमीन कमी रकमेत मिळत आहे म्हणून एखाद्याने त्याच्या जवळची रक्कम यामध्ये गुंतवली आहे म्हणून त्या व्यक्तीने त्या लोकांच्याकडून कुलमुखत्यारपत्र अथवा अधिकारपत्र लिहून घेऊन त्यांची बाजू कोर्ट कचेरी मध्ये मांडत असतात कारण यामध्ये त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून. परंतु समाजसेवकांनी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारपत्र लिहून घेतल्याचे पहिल्यांदाच पाहिले आहे अशी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सूत्रांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला समाजसेवक समजणारे काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण यांनी सर्किट हाऊस कराड येथे मंगळवार दिनांक 29/4/2025 रोजी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये त्यांचे असे म्हणणे होते की मी समाजसेवक म्हणून सभासदांच्या बाजूने उभा आहे व या सभासदांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देणार आहे यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते परंतु समाजसेवक संजय चव्हाण यांनी सभासद व सभासदांचे वारस असे एकूण 21 लोकांचे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती त्यांची बाजू मांडण्यासाठी अधिकारपत्र का? लिहून घेतलेले आहे.
जर संजय चव्हाण हे खरंच समाजसेवक आहेत व त्यांना निस्वार्थीपणाने या सर्व सभासदांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर ते सभासदांच्या कडून 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती अधिकारपत्र लिहून घेऊनच मदत करू शकतात का? अधिकारपत्र न घेता ते सभासदांच्या बरोबर राहून त्यांना मदत करून न्याय मिळवून देहू शकत नाहीत का ? की त्यांना अधिकारपत्र लिहून घेतल्याशिवाय न्याय मिळवून देता येणार नाही.
तसेच काकासो उर्फ संजय चव्हाण यांनी सभासद व सभासदांचे वारस असे एकूण 21 लोकांच्याकडून त्यांची बाजू मांडण्यासाठी अधिकारपत्र लिहून घेतलेले आहे. त्यामध्ये पहिले नाव मधुकर आनंदा चवरे यांचे आहे. त्यांनीही त्यांची व त्यांच्या बरोबर असणारे सर्व सभासद व सभासदांचे वारस यांची बाजू मांडण्यासाठी काकासो उर्फ संजय चव्हाण यांना 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती अधिकारपत्र करून दिलेले आहे.
परंतु सध्या सर्वत्र अशी चर्चा चालू आहे की मधुकर चवरे यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सभासदांच्या कडून एफिडेविड तयार करून घेतले असून त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जमीन मिळवून देण्यासाठी वेळ व पैसा खर्च करत असल्याने तुम्हास जमीन मिळाल्यास त्यातील प्रत्येकी एक गुंठा जमीन तुम्हास व उर्वरित जमीन आम्हास ठेवण्याची आहे असे नमूद करून एफिडेविड केल्याचे सर्वत्र चर्चा सुरू आहे मग हे असे असेल तर मधुकर चवरे यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी काकासो उर्फ संजय चव्हाण यांना अधिकारपत्र लिहून दिलेले आहे तर यासाठी नक्की वेळ व पैसा कोण खर्च करणार व जमीन मिळाल्यानंतर सभासदांना प्रत्येकी एक गुंठा देऊन उर्वरित जमीन कोणाला मिळणार आहे. याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
क्रमशः