
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कराड उत्तर मध्ये विविध ठिकाणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटण्यात आलेले होते. ज्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन सापडले होते अशा रुग्णांना पुणे येथील देसाई हॉस्पिटल येथे नेऊन त्यांचे मोफत ऑपरेशन करून त्यांना घरी आणून सोडले जाते. यापैकीच एक बस वाठार किरोली येथून जवळपास 60 रुग्णांना घेऊन पुण्याकडे रवाना झाली. यावेळी एच. व्ही. देसाई हॉस्पिटलचे डॉक्टर्स खटाव माण कारखान्याचे संचालक कृष्णात शेडगे यांनी नारळ फोडून बस पुण्याकडे ऑपरेशनसाठी रवाना केली. गेल्या दहा वर्षांमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंचच्या माध्यमातून सातत्याने आरोग्य विषयक मोठ्या प्रमाणात काम केले जाते. आज पर्यंत जवळपास 20 हजाराच्या आसपास मोतीबिंदूची मोफत ऑपरेशन केलेली आहेत. इथून पुढे सुद्धा हे कार्य अविरत चालू राहणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.
यावेळी विकास गायकवाड, सोमनाथ भोसले, सुनिता कांबळे, सुरेश गायकवाड, गणेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, निलेश गायकवाड, बाळू पाटील, अण्णा चव्हाण, विनायक जंगम, चंद्रकांत पाटील, धनाजी पाटील, सचिन काटे, दुष्यंत शिंदे, निलेश शेडगे, सुधीर शेळके, जितेंद्र फाळके, अमोल घाडगे, सुनील चव्हाण, महादेव खिलारे, नवनाथ भोसले, भगवान ठोंबरे, दत्तात्रय गायकवाड, सुभाष गायकवाड, वैजनाथ जंगम, हनुमंत सुतार, सुरज घोरपडे, कमलाकर गायकवाड, शुभम खिलारे, यश शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.