
कराड : आरोग्य विषयक काळजी घेत कोणत्याही वयात रनिंगसह कोणत्याही क्रिडा प्रकारात सहभागी होता येते. साहस हेच यशाचे दार उघडते आणि त्यासाठी कणखर मानसिकता आणि ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड अॅथलेटिक्स कोच शिव यादव यांनी केले.
मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वात जुनी व खडतर मानली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन झाली. या 90 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत डॉ. सी. व्ही. महाजन, डॉ. शैलेश पाटील आणि संदीप पाटील या कराडमधील तिघा धावपट्टूंनी यश मिळविले आहे. त्याचबरोबर प्रथमच कराड ते श्री क्षेत्र पंढरपूर सायकल वारीत सहभागी होत 156 किलोमीटर सायकलिंग करणार्या सौ. जागृती गुरसाळे, माधुरी पंचारिया या गृहिणींसह अन्यया देशमुख, श्रावणी किरपेकर व सर्वात कमी वयाचा सायकलपट्टू बनलेला शौर्य बेलापुरे यांचा सह्याद्री रनर्स ग्रुपकडून विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कराड अर्बंन कुटूंब प्रमुख सुभाषराव जोशी, अर्बन बँकेंचे चेअरमन डॉ. सुभाष एरम, व्हाईस चेअरमन समीर जोशी, अर्बंन बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट डॉ. अनिल लाहोटी, मुख्याधिकारी सीए दिलीप गुरव, सह्याद्री रनर्स ग्रुपचे डॉ. राहुल फासे, अभय नांगरे यांच्यासह सह्याद्री रनर्स व कराड सायकल क्लबचे सर्व सदस्य, क्रीडा प्रेमी नागरिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी क्रॉमेड मॅरेथॉनमध्ये यश मिळविणार्या कराडमधील पहिले तीन धावपट्टू बनलेल्या तिघांचा मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच सायकलवारी पूर्ण करणार्या गृहिणींसह चिमुकल्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर शिव यादव यांनी मॅरेथॉन किंवा धावण्याची सुरुवात कशी करावी? चालणे हा व्यायाम का आणि कसा करावा? आणि त्यातील योग्य तंत्र, फायदे व नियमितता या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यापात व्यायामासाठी वेळ कसा काढावा ? 40 वर्षांनंतर धावणे आणि चालणे यासारखे व्यायाम व मॅरेथॉन करताना घ्यावयाची विशेष काळजी आणि टिप्स या विषयावरही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मॅरेथॉनसाठी तयारी करताना आहार, झोप आणि मानसिक दृष्टिकोन कसा हवा ? या विषयावर शिव यादव बहुमोल मार्गदर्शन केले.
सत्कारास उत्तर देताना डॉ. सी. व्ही. महाजन, डॉ. शैलेश पाटील आणि संदीप पाटील यांनी कॉमे्रड मॅरेथॉनची तयारी कशी केली? स्पर्धेत यश मिळविण्यापूर्वी मागील चार ते सहा महिन्यात कसा संघर्ष केला ? कॉमे्रड मॅरेथॉनसह अन्य धावण्याच्या स्पर्धेत यश मिळविताना काय – काय करावे ? यासह विविध विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी समीर जोशी, सीए दिलीप गुरव, डॉ. सुभाष एरम आणि सुभाषराव जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना कराड अर्बंन बँक सर्वातोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. तसेच जगातील सर्वात अवघड अशी कॉमे्रड मॅरेथॉन पूर्ण केलेल्या डॉ. सी. व्ही. महाजन, डॉ. शैलेश पाटील व संदीप पाटील या तिघांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यापासून प्रेरणा घेत कराड तालुक्यातून नवनवीन धावपट्टू निश्चितपणे घडतील असा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी प्रास्ताविक करताना डॉ. राहुल फासे यांनी प्रास्ताविक करताना सह्याद्री रनर्सची या कार्यक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली. तसेच नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासह कराडच्या क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी सह्याद्री रनर्स प्रयत्नशील असल्याचे डॉ. राहुल फासे यांनी सांगितले. मानपत्राचे वाचन अरविंद यादव, अर्जुन भिंगारे, ओंकार ढेरे यांनी वाचन केले. सूत्रसंचालन ईरा बोलापुरे यांनी केले. तर अभय नांगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.