
कराड ः कोरीवळे ता.कराड येथे पुर्णत्वास आलेल्या ओढाजोड प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळेल, त्याचबरोबर गावच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
ते कोरीवळे ता. कराड येथे ओढाजोड प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा व रस्त्यांच्या भूमीपुजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमास सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयंत जाधव (बापू), कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव, रामचंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, या ओढाजोड प्रकल्पामध्ये एका ओड्यावर सिमेंट बंधारा बांधून त्यामधील पाणी दुसऱ्या ओढ्यामध्ये सोडण्यात आल्यामुळे शेती सिंचनाची मोठी सोय झाली आहे, तसेच या ओढाजोड प्रकल्पामुळे ओढ्या लगत असणाऱ्या सुमारे 40 ते 45 विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजना प्रशासकीय मान्यता जा.क्र. जिनिस/2024/मार्च/07499 दिनांक/03/2024 नुसार नावीन्यपूर्ण योजनेतून 17.50 लाख निधी मंजूर करण्यात आला होता. सदरचे काम दिनांक 09/10/2024 रोजी पूर्ण झाले आहे.
या ओढाजोड प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळेल, त्या माध्यमातून शेती बागायत होवून ग्रामस्थांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी जयवंत मोहिते, संपत मोहिते, तानाजी मोहिते, बाळासो मोहिते, दिलीप पवार, दिनकर माळी, विकास हत्ते, संभाजी मोहिते, प्रशांत मोहिते, सुजित मोहिते, प्रकाश निगडे, संदीप मोहिते, सागर गायकवाड, कुलदीप मोहिते, तानाजी निकाळजे, काशिनाथ निकाळजे, हणमंत मोहिते, गणेश मोहिते, आदित्य मोहिते, हिम्मत मोहिते, विजय हिरवळे, शुभम निगडे, मयुर निकाळजे, दीपक मोहिते, बाळासो मोहिते, संतोष मोहिते, राजेंद्र मोहिते, रामचंद्र शेळके, राजेंद्र मोहिते, संपत निगडे, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री करपे, शाखा अभियंता श्री सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री कोकरे, श्री मोरे, ठेकेदार देवानंद चव्हाण, सयाजी माने तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.