
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराड तालुक्यातील अनेक दिग्गज व्यक्तींनी आज भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल बाबा भोसले व कराड उत्तरचे कार्यसम्राट आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे माजी या प्रवेशामुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे.
यावेळी विलास माने ज्येष्ठ नेते चरेगाव, गणेश उर्फ देवदत्त माने लोकनियुक्त सरपंच चरेगाव, उमेश साळुंखे काँग्रेस सेवा दल सरचिटणीस महाराष्ट्र, कृष्ण बर्गे माजी सरपंच शितळवाडी, सतीश डुबल माजी उपसरपंच, जयवंत माने माजी उपसरपंच, अभिजीत माने माजी उपसरपंच, प्रकाश माने सदस्य, विक्रम माने, महेश माने, महेंद्र सूर्यवंशी, विश्वनाथ कदम, दत्ताजीराव खिलारे, महेश लोहार, संजय कुंभार, हनुमंत माने, विवेक साळुंखे, सुरेश साळुंखे, संभाजी साळुंखे, जयसिंग घाडगे, दादासो माने, सूर्यकांत माने, शरद माने, संदीप माने, प्रमोद माने, सुरेश माने, निलेश इनामदार, सुभाष इनामदार, स्वप्निल माने, आदित्य बागल, मोहम्मद डांगे, संभाजी माने, महेश माने, हेमंत माने, राजेंद्र माने, आबा माने अनिल माने यांनी आज प्रवेश केला.
उंब्रज, पाल व मसूर गटातील हजारो कार्यकर्ते मनोज दादांच्या पाठीशी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व काँग्रेस पक्षाचे उंब्रज पाल व मसूर गटातील हजारो कार्यकर्त्यांनी आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला. यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेवर घवघवीत यश संपादन होईल.


