
कराड : महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या असोसिएशन संलग्न सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या कापील गावचे सुपुत्र मा.भाऊसाहेब ढेबे पाटील यांची कराड तालुका अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. रविवारी सातारा येथे झालेल्या समारंभात त्यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पै.गणेश मानुगडे यांनी निवड पत्र दिले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, उप महाराष्ट्र केसरी आबा सुळ, उप महाराष्ट्र केसरी चंद्रकांत सुळ, पै.सागर भाऊ साळुंखे, जुन्या काळातील नामवंत मल्ल व उद्योगपती श्रीकृष्ण दादा बराटे, हिंदकेसरी संतोष आबा वेताळ, पै.संग्रामसिंह माने उद्योगपती श्री. उदय देवकर, जिल्हाध्यक्ष अमर साबळे, लेखिका काजल भालेराव, पै.संदीप रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ते कराड तालुक्याच्या सल्लागार पदी गेले तीन वर्ष कार्यरत असून त्यांनी तालुक्यात कुस्ती साठी विविध उपक्रम राबवले होते त्याचीच दखल घेत त्यांना अध्यक्ष या पदावर सर्वानुमते नियुक्त केले. तसेच ते कल्पवृक्ष उद्योग समूहचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रात त्याचे तालुक्यात भरीव योगदान असते. त्यांच्या निवडीने कराड पंचक्रोशीतील अनेक क्रीडा संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मल्लविद्या महासंघाने माझ्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणे हे माझे कर्तव्य समजतो व येणाऱ्या काळात तालुक्यात संघटना मजबूत करून गरीब व होतकरू मल्लांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.