
कराड : कराड तालुक्यातील उंब्रज मंडल मध्ये मोठ्या प्रमाणात लाल मातीचे उत्खनन सुरू आहे. तसेच त्या केलेल्या लाल मातीच्या उत्खननापासून विटा बनवल्या जातात. उंब्रज मंडल मधील काही गावांमध्ये वीट भट्ट्या आहेत. त्या रस्त्याच्या शेजारी असल्यामुळे धुळीचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना होत आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात त्या वीटभट्ट्यातून विटांनी भरलेल्या गाड्या ट्रॅक्टर बाहेर काढताना त्या वाहनांच्या चाकांना चिखल चिटकून सर्व चिखल रस्त्यावरती येत असतो, त्यामुळे टू व्हीलर व इतर गाड्या चिखलामुळे स्लिप होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.
उंब्रज मंडल मध्ये चालू असलेल्या वीटभट्ट्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये चालू आहेत त्या जागेचे तो व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी बिनशेती आदेश घेतलेले आहेत का ? याबाबत मंडल अधिकारी उंब्रज यांनी पाहणी करून त्याबाबतचा तपासणी अहवाल आपल्या दप्तरी अथवा आपल्या वरिष्ठ कार्यालयात दिला आहे का ? याबाबत काही संघटना व सामाजिक कार्यकर्ते पत्रव्यवहार करून माहिती घेणार आहेत.
उंब्रज मंडल अधिकारी यांच्याकडे एक अनोखी शक्ती होती. त्यांच्या मंडल मध्ये कोणत्याही शेत जमिनीमध्ये मुरूम टाकून जमीन लेव्हलिंगचे काम चालू असेल त्या ठिकाणी ते शक्तिमान सारखे प्रकट होऊन त्यांच्या संबंधित नसेल तर त्या जागेचा लगेच पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर करत होते व त्यानंतर क्लार्कच्या मागे लागून तत्काळ नोटीस काढून त्या जमीन मालकास लगेच मिळत असे अशी चर्चा उंब्रज मंडल मध्ये सुरू आहे.
परंतु उंब्रज मंडल मध्ये ज्या वीटभट्ट्या आहेत. त्यातील किती व्यवसायकांनी बिनशेती आदेश घेतलेले आहेत, त्यांनी किती रॉयल्टी भरली, त्या भरलेल्या रॉयल्टी एवढेच उत्खनन केले आहे की ज्यादा उत्खनन केले आहे. याबाबत वीट भट्टी व्यवसायकावरती ज्यादा उत्खनन अथवा विना परवानगी गाळ उत्खनन केला असल्या बाबत कोणतीही पाहणी अथवा तपासणी करून कोणतीही कारवाई केल्याचे निदर्शनात आले नसल्याचे बोलले जात आहे.
सध्या उंब्रज मंडल मध्ये सुरू असलेल्या वीटभट्ट्या मध्ये किती व्यवसाय धारकांनी बिनशेती आदेश घेतलेले आहेत. त्यांनी भरलेल्या रॉयल्टी एवढीच लाल माती उत्खनन करून विटा काढलेल्या आहेत का? याबाबत काही समाजसेवक लवकरच उलगडा करणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी व सातारा जिल्हा खनिकर्म अधिकारी तपासणी करून जादाच्या उत्खनावरती व बेकायदेशीर उत्खनावरती कारवाई करणार का ? याबाबत काही सामाजिक कार्यकर्ते पाठपुरावा करणार आहेत.
क्रमश :