शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शामगाव येथे मुंडण

कराड, : शामगाव ता कराड येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न संदर्भात आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी मुंडण करण्यात आले.
शामगावच्या शेती पाण्यासाठी ग्रामस्थ अमर उपोषणास बसले आहेत. 151 ग्रामस्थांनी मुंडण करुन शासनाचे लक्ष वेधले. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, हिंद केसरी संतोष वेताळ, वडोली निळेश्वरचे विजय पाटील, निलेश पवार, नडीशीचे रविंद्र थोरात, वाहगावचे अनिकेत पवार, तसेच पाचूंदचे ग्रामस्थांनी उपस्थिती लावली.
पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, सायंकाळी आरोग्य विभागाने उपोषण कर्त्यांची तपासणी केली. तसेच या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजता हरिपाठ, रात्री दहा वाजता किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.