सरकारला शेवटची संधी ६० दिवसांची : साखळी उपोषण सुरूच राहणार

जालना- मनोज जरांगे- पाटील यांची समजूत काढण्यात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला यश आले असून आणखी ६० दिवसांचा कालावधी सरकारला वाढवून देण्यात आला आहे. सरकारने सरसकट कुणबी आरक्षण मराठ्यांना २ जानेवारीपर्यंत द्यावे, या अटीवर उपोषण सोडत असल्याचे मनोज जरांगे- पाटील यांनी सांगितले असून साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, दिवाळी सर्वांना गोड झाली पाहिजे. एकाला गोड आणि दुसऱ्याला कडू या मताचा मी नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करा. वेळ घ्यायचं तर घ्या. पण सगळ्या भावांना आरक्षण द्या, असं ठरलं. त्यांनी ते मंजूर केलं. ही समिती महाराष्ट्रभर काम करेल. अहवाल देईल. आम्ही त्यांना सांगितलं ही शेवटची वेळ आहे. निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील शुक्रे यांनी आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते.
अधिवेशन डिंसेबर महिन्यात
7 डिसेंबर पासून अधिवेशन सुरू होणार असून जे अॅडशिनल मुद्दे आहेत ते 10 डिसेंबर पर्यंत घेतले जातील असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार असून यामध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय लागेल, असा मार्ग दिसू लागला आहे.