लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या पाठीशी राज्य शासन भक्कम : मंत्री शंभुराज देसाई

पाटण : राज्यातील साखर उद्योगाची परिस्थिती सध्या अडचणीत असून ही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील आहे.त्यामुळे या पुढे ही देसाई कारखान्याने पारदर्शक कारभार करून आपले उद्दिष्ट पार करून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे तसेच देसाई कारखान्याने आता साखर निर्मिती बरोबर इथेनॉल सारखे सह प्रकल्प उभारावेत त्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी देसाई कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी दिली. दरम्यान राज्यातील उसाचे क्षेत्र घटत असल्याने राज्यातील सहकारी साखर उद्योग यावर्षी प्रतिकूल परिस्थितीतून सामोरे जावे लागणार आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस आणि पाण्याचे प्रमाण ही कमी असल्याने शेतीसाठी पाण्याचा वापर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जपून आणि काटकसरीने करावा असे आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
ते दौलतनगर ता पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ५०व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण स संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई, चि.जयराज देसाई, अशोकराव पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण,जयवंतराव शेलार,सोमनाथ खामकर,गजानन जाधव,शशिकांत निकम, ॲङ डी. पी. जाधव, ॲङ मिलिंद पाटील, भरत साळूंखे, अभिजित पाटील, संजय देशमुख, सुनील पवार, सुनील पानस्कर, बाळासो पाटील, हणमंतराव चव्हाण, लक्ष्मण देसाई, प्रदिप पाटील,प्रभाकर शिंदे, बबनराव शिंदे, बशीर खोंदू, विजय पवार, प्रकाश जाधव, सर्जेराव जाधव, मनोज मोहिते, जोतिराज काळे, पांडूरंग नलवडे, शशिकांत निकम, प्रशांत पाटील, विजय पवार, नथूराम कुंभार, विलास गोडांबे, चंद्रकांत पाटील, बळीराम साळूंखे, विजय सरगडे, विजय जंबुरे, बबनराव भिसे, माणिक पवार, कार्यकारी संचालक सुहास देसाई यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी पाटण तालुक्यातील जेष्ठ 14 ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
मंत्री ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले, राज्यातील सहकारी साखर उद्योग यावर्षी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून राज्यातील ऊसाचे क्षेत्र ही घटत आहे.राज्यातील पाणीपरिस्थिती या वर्षी बरी तरी आहे मात्र पुढच्या लागणी वेळी पाण्याची परिस्थिती कशी राहील हे सांगता येत नाही कारण यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्के पाणी एकट्या कोयनेत या वर्षी कमी आहे परिणामी राज्यातील पिण्याची पाण्याचे नियोजन करणेकरिता येत्या २ जुलै २०२४ पर्यंत पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले असून या मधून शिल्लक राहिलेले पाणी शेतीसाठी अथवा इतर उद्योगधंद्यांसाठी वापरायचे आहे त्यामुळे आगामी काळात शेतीसाठी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा लागणार आहे.
दरम्यान जुलै २०२४ पर्यंत पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन शासन पातळीवर ठरले असून कोयना काठावर पाटण मतदार संघातील ५० टक्के पेक्षा जास्त उसाचे क्षेत्र आहे .कोयना धरणातील ६७ टीएमसी पाण्याचा वापर हा केवळ विजनिर्मिसाठी केला जातो त्यापैकी १० ते २० टक्के पाणी शेतीसाठी वाळवावे असे नियोजन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे ही मंत्री ना. देसाई यांनी शेवटी सांगितले.