कराड तालुक्यात रेठरे बुद्रुक आणि टेंभू ग्रामपंचायतीला चुरशीने मतदान सुरू

कराड | कराड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7 वाजलेपासून मतदानाला चुरशीने सुरूवात झाली. तालुक्यात रेठरे बुद्रुक आणि टेंभू या दोन ग्रामपंचायतीसाठी जोरदार मतदान होताना पहायला मिळत आहे. रेठरे येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांच्या गटात लढत होत आहे. रेठरे येथे डाॅ. अतुल भोसले यांनी 7 जागांवर अपक्ष बाजी मारल्याने सत्ता राखण्यात यश मिळवेल असे दिसत आहे. परंतु, पृथ्वीराज चव्हाण यांचे सरपंच पदाचे उमेदवार दिग्वीजय सुर्यवंशी यांनी निवडणुकीत रंगत आणल्याचे सांगितले जात आहे.
कराड तालुक्यात 16 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम झाहीर झाला होता. त्यापैकी करंजोशी, सावरघर, यशवंतनगर, डिचोली या 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. शेळकेवाडी (येवती) येथील सरपंचपद पदासाठी एकच अर्ज आल्याने ती जागा बिनविरोध झाली आहे. भोसलेवाडीत सरपंच पदासाठी तीन, सदस्य 21, बानुगडेवाडी सरपंच चार, सदस्य 14, गोसावेवाडी सरपंच दोन, सदस्य 12, हेळगाव सरपंच सहा, सदस्या 19, कांबीरवाडी सरपंच तीन, सदस्य 18, पिंपरी सरपंच दोन, सदस्य 10, शेळकेवाडी सरपंच एक, सदस्य 10, येणपे सरपंच तीन, सदस्य 29, येवती सरपंच तीन, सदस्य 24, रेठरे बुद्रुक सरपंच 15, सदस्य पदासाठी सर्वात जास्त अर्ज 92 दाखल झाले आहेत तर सयापूर सरपंच दोन, सदस्य पाच, टेंभू सरपंच पाच, सदस्य 34 अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर सरपंच पदासाठी 53 तर सदस्य पदासाठी 323 उमेदवारी अर्ज दाखल झाले.
वाठार, शहापूर, लोहारवाडी, चिंचणी, भांबे, डेळेवाडी, धावरवाडी, आंबवडे, हवेलवाडी या ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक लागली असल्याने येथेही मतदान होत आहे. त्यामध्ये फक्त वाठार येथे दोन तर शहापूर येथे एक उमेदवार आज नशिब आजवामात आहे.