कराड तालुक्यात 12 ग्रामपंचातीसाठी 80 टक्के मतदान; उद्या मतमोजणी

कराड, ः कराड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीची निवडणुक रविवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. यात सरासरी 80 टक्के मतदान झाले. गोसावेवाडी व कांबीरवाडीत सर्वाधिक 92 टक्के मतदान झाले. मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशिन तहसिल कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या. सोमवारी सकाळी 9 वाजता प्रशासकीय ईमारतीच्या तळ मजल्यावर मतमोजणी होणार आहे.
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान मुदत संपणाऱ्या कराड तालुक्यातील एकुण 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यातील करंजोशी, सावरघर, यशवंतनगर व पुर्न.डिचोली या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरीत 12 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसात वाजता ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान करण्यात आले.
यात ग्रामपंचायत निहाल झालेले मतदान पुढीलप्रमाणे, भोसलेवाडी 85.78 टक्के, बानुगडेवाडी 90.96 टक्के, गोसावेवाडी-92.04 टक्के, हेळगाव 80.62 टक्के, कांबीरवाडी 92.27 टक्के, पिंपरी-81.87 टक्के, शेळकेवाडी (येवती) 62.57 टक्के, येणपे-71.60 टक्के, येवती 63.38 टक्के, रेठरे बु. 68.65 टक्के, सयापुर 82.84 टक्के व टेंभू 86.94 टक्के ईतके मतदान झाले. मतदान झाल्यानंतर संध्याकण सर्व ईव्हिएम मशिन तहसिल कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तहसिल कार्यालयाच्या तळमजल्यावर आज सकाळी 9 वाजता मतमोजणी होणार आहे.