कराडात तडीपार गुंड जेरबंद

कराड ः येथे तडीपार असणाऱ्या संशयिताला कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एसटी स्टॅड परिसरात फिरताना शनिवारी ताब्यात घेतले.
अविनाश प्रताप काटे असे ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील संशयित अविनाश काटे व त्याचे इतर साथीदारांना कराड शहर पोलीसांनी 2 वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र तडीपार असताना अविनाश हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील कराड बसस्थानक येथे येवून दहशत माजवत असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरिक्षक राजू डांगे यांना मिळाली होती. राजू डांगे आपल्या कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी पोहचले. पोलिसांची चाहूल लागतात तडीपार असलेल्या अविनाश काटे याने पालन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कराड विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सहाय्यक फौजदार देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे.