
कराड : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, विलास भंडारे, जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे, कार्यकारी संचालक राम पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, एम.के.कापूरकर यांनी स्व. यशवंतराव मोहिते भाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला. संचालक धोंडीराम जाधव यांनी आभार मानले. यावेळी हेमंत पाटील, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.