राज्यसातारा

कराड तालुक्यात महसूली दप्तरात कुणबी नोंदी शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू

कराड : कराड तालुक्यातील महसूल यंत्रणा तहसील कार्यालयात असलेल्या अभिलेख कक्षातील कागदपत्रात कुणबी नोंदीच्या शोधमोहिमेला लागलेली आहे.

या शोधमोहिमेत आता भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, शिक्षणविभाग, पोलीस, विभागांच्या नोंदीचाही समावेश करणेत येणार आहे. यामध्ये जन्ममृत्यू नोंदी, जुने दस्तावरील नोंदी, सिटीसर्व्हे, फेरफारवरील नोंदी तपासण्यात येणार आहेत.

कुणबी जात प्रमाणपत्र देणेसंदर्भात पुरावा संकलन कक्ष मा.उपविभागीय अधिकारी कराड यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात स्थापन करणेत आलेला आहे. तहसील कार्यालयातील अभिलेख्र कक्षात कुणबी नोंदी शोधणेसाठी कर्मचा-यांची दैनिक शोधमोहिम युध्दपातळीवर सुरु आहे.

11 नोव्हेंबरपर्यंत 98081 महसूली अभिलेखातील नोंदी तपासणेत आलेल्या आहेत, त्यापैकी एकूण 1867 अभिलेख्यात कुणबी नोंद दिसून आलेल्या आहेत. कराड तालुकेतील 219 गावाचे अभिलेखे तपासणी करणेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अशी माहिती कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. स्वत: लक्ष देवून कर्मचा-यांना येत असलेल्या अडचणीबाबत मार्गदशन करीत आहेत. तसेच ही शोधमोहिम निर्दोष व व्यापक व्हावी म्हणून वेळोवेळी सूचनाही देत आहे.

याचबरोबर कराड तालुक्यातील जुन्या दस्तएैवज, 7/12, फेरफार महसूली पुरावे, दुय्यम निबंधक कार्यालयाकडील दस्त यामध्ये कुणबी अशी नोंद असेल तर ती तहसील कार्यालयात सादर केलेस कुणबी शोधमोहिमेचे काम सुलभ होणार आहे. कुणबी नोंदीचे असलेले पुरावे तहसील कार्यालयात सादर करणेचे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी नागरीकांना केले आहे.

1930 पूर्वीच्या दस्तांमध्ये काही दस्त, 7/12 तसेच फेरफार हे मोडी लिपीत असलेचे आढळून आलेले आहेत. मोडी लिपी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. 1890 ते 1912 मधील जुन्या दस्तऐवजांमध्ये कुणबी नोंदीची शक्याता गृहीत धरुन अशा मोडी लिपीतील दस्तांचे वाचनासाठी मोडिलिपी तज्ञ मदत घेणेत येणार असलेचे विजय पवार यांनी सांगितले.

तहसील कार्यालय कराड मधील नोंदीची रोजची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयास Google Spread Sheet Drive वर रोज पाठविणेत येत आहे. तहसीलदार विजय पवार, निवासी नायब तहसीलदार बी.के.राठोड, युवराज काटे, नितीन गोरे यांचे मार्गदर्शनाखाली महसूल सहाय्यक बाळकृष्ण बाबर, त्यांचे पथक अभिलेख कक्षातील शोधमोहिमेचे कामकाज करीत आहेत.

आजअखेर कराड तालुक्यातील महसूली अभिलेखे तपासले असता 1948 ते 1967 या कालावधीमधील 12980 नोंदी, 1948 पूर्वीचे 85101 अशी एकूण 98081 नोंदीची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये आजअखेर 1867 कुणबी नोंद असलेचे आढळून आले आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपुर वापर करताना इतर विभागातील कर्मचारीही कुणबी नोंद शोधमोहिमेत सामिल करणे आवश्यक आहे.               – विजय पवार, तहसीलदार, कराड

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close